Share

‘द काश्मीर फाइल्स’ विरोधात कमेंट करणं बँक मॅनेजरला भोवलं, संतप्त नागरिकांनी उचललं टोकाचं पाऊल

crime

बॉक्स ऑफिसवर काश्मिरी पंडितांवर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ दमदार कमाई करत आहे. अनेक भाजपशासित राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी केली जात आहे. रिलीज झाल्यापासून ‘The Kashmir Files’ हा चित्रपट अनेक कारणांनी चांगलाच चर्चेत आहे.

अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. अगदी सामान्य प्रेक्षक, समीक्षक यांच्यापासून ते थेट बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी या चित्रपटावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र एका व्यक्तीला ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाविरोधात कमेंट करणं महागात पडलं आहे.

यातूनच संतप्त नागरिकांनी संबंधित व्यक्तीला मंदिरात बोलावून नाक घासायला लावलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..?

ही घटना आहे अल्वरमधील बेहरोरच्या गोकुलपूरमधील असल्याची माहिती मिळत आहे. राजेश असं या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हा एका खासगी बँकेत सिनिअर सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत आहे. अलीकडेच त्याने फेसबुकवरून द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाविरोधात भाष्य केलं होतं.

त्याने कमेंटमध्ये म्हंटलं होतं की, ‘चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे, पण इतर जातींवरही अत्याचार झाले आहेत. पाली येथील जितेंद्र पाल मेघवाल यांनाही तडीपार करण्यात आलं होतं, अशी कमेंट राजेश यांनी केली होती. त्याच्या या कमेंटनंतर हे प्रकरण चिघळल.

मंगळवारी काही लोकांनी स्थानिक मंदिरात बैठक बोलावली. द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाविरोधात भाष्य केलेल्या राजेशलाही बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी संतप्त नागरिकांनी राजेशला देवासमोर नाक घासण्यासही भाग पाडलं. याचबरोबर बळजबरीनं नाक घासायला लावल्याचा आरोप राजेश यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नारायण राणे यांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्ही कधीही कॉल करा पण…’
‘त्या’ रुग्णालयात माझ्या हत्येचा कट रचला होता पण..; नितेश राणेंच्या वक्तव्याने खळबळ
“मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला, घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले”
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा मुंबईच्या संघाला किती फायदा होणार? रोहित शर्माने केला मोठा खुलासा

इतर क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now