उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपच्या मंत्री आणि आमदारांना फोडून समाजवादी पक्षाने मोठा धक्का दिला होता. अशातच आता भाजपने थेट समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या घरातच फूट पाडली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश झाला आहे.
अपर्णा या मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा आणि अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांची पत्नी आहे. अपर्णा यांनी 2017ची विधानसभा निवडणूक लखनऊच्या कँट मतदारसंघातून लढवली होती. त्यांच्यासाठी अखिलेश यांनी प्रचारही केला होता. पण निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला.
अखेर आज अपर्णा यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. दिल्लीमधील भाजपा कार्यालयात उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पक्षातील तीन मंत्री आणि काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
हरियाणाचे भाजपा प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितलं होतं की, “मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतिक याची पत्नी अपर्णा यादव उद्या भाजपात प्रवेश करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पक्षप्रवेश होईल”.
https://twitter.com/beingarun28/status/1483466537361362944?s=20
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शुल्लक फायद्यासाठी तीन मायलेकींनी ४२ लेकरांचा केला खुन, वाचा महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेबद्दल..
‘या’ अभिनेत्रीमुळे मोडला धनुष आणि ऐश्वर्याचा १८ वर्षांचा सुखी संसार
सिनेसृष्टीत खळबळ; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याच्या कडेला गोणीत सापडला मृतदेह
शरद पवार यांना पाहताच बहिणीला अश्रू अनावर; भावाबहिनीमधील प्रेम पाहून कार्यकर्ते गेले गलबलून….






