Share

aparna tandle : पुण्याच्या ‘कामवाली बाई’चा युट्युबवर राडा, ३० कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला अन्…

aparna tandale

aparna tandle top in youtube shorts  | सोशल मीडियावर कधी कोण फेमस होईल हे सांगता येत नाही. अनेक तरुण सोशल मीडियावर आपली कला सादर करत प्रसिद्धी मिळवत आहे. चांगल्या कलेमुळे लोकं त्यांना पसंत करत आहे. अनेक कलाकार हे युट्युबवरही व्हिडिओ शेअर करतात. आता युट्युबने युट्युबवर सर्वात लोकप्रिय ठरलेल्या १० व्हिडिओंची यादी शेअर केली आहे.

१० सर्वात लोकप्रिय ठरलेल्या व्हिडिओंमध्ये पहिल्या क्रमांकावर पुण्याची तरुणी आहे. अपर्णा तांदळे असे त्या तरुणीचे नाव आहे. तिला युट्युबवर कामवाली बाई म्हणून ओळखले जाते. सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या टॉप क्रिएटर्सच्या यादीत कामवाली बाई ही पहिल्या क्रमांकावर आहे.

अपर्णा तांदळेचा कामवाली बाई या वेब सिरिजमधला बारिश मैं भिगना हा व्हिडिओ खुप व्हायरल झाला आहे. तो शॉर्ट्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हा व्हिडिओ तब्बल ३० कोटी लोकांनी बघितला आहे. विशेष म्हणजे अपर्णाचे वय फक्त २२ वर्षे आहे.

फक्त २२ वर्षांची असताना अपर्णा युट्युबसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. अपर्णा ही हडपसरची रहिवासी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबियात जन्मलेल्या अपर्णाचा दोन बहिणी आणि आईवडिल असा परिवार आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

अपर्णाचे शिक्षण पुण्यातील कॅम्प एज्युकेशन कन्या शाळेत झाले आहे. तर महाविद्यालयाचं शिक्षण तिने हुजूरपागा आणि गरवारेमधून घेतले आहे. कॉलेजमध्ये असतानाही अपर्णा नाटकामध्ये भाग घ्यायची. तिला पुढे जाऊन अभिनय क्षेत्रामध्येच करिअर करायचं होतं.

सुरुवातीला अपर्णाने मॉडेलिंग सुद्धा केली. पण त्यानंतर तिने युट्युबच्या शॉर्ट्स ब्रेकवर कामवाली बाईचे शिला दीदीचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्या व्हिडिओंमध्ये ती वेगवेगळे बदल करत गेली आणि आता ती युट्युबवर खुपच प्रसिद्ध झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
chandrakant patil : भयंकर चिडलेले चंद्रकांत पाटील थेट एकेरीवर आले; म्हणाले, नाना पटोल्या हिंमत असेल तर माझ्यासमोर ये अन्…
“हा तर रोहीतचाही बाप निघाला”, इशानच्या झंझावाती द्विशतकानंतर चाहत्यांनी केले तुफान कौतुक; वाचा भन्नाट प्रतिक्रीया
आताची सर्वात मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, तुफान राडा; वाचा नेमकं काय घडलं

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now