Share

भविष्यात माझी जागा कोणीही घेऊ शकतो, गरज नाही की त्याचे आडनाव टाटाच हवे- रतन टाटा

मुंबई | टाटा ट्रस्टवर (tata group) टाटा कुटुंबियांचा कोणताही असा विशेष अधिकार नाही. भविष्यात टाटा कुटुंबियांच्या बाहेरच्या व्यक्तीकडे याची जबाबदारी दिली जाऊ शकते. असे खुद्द रतन टाटा यांनी न्यायालयाला सांगितले आहे. रतन टाटा (ratan tata) सध्या टाटा समुहाचे चेअरमन आहेत.

मिस्त्री कुटुंबियांची कंपनी असलेल्या सायरस इन्व्हेस्टमेंटद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेला उत्तर देताना रतन टाटा यांनी सांगितले की, भविष्यात माझे पद आणखी कोणीतरी सांभाळू शकेल. गरज नाहीये त्याचे आडनाव टाटाच असायला हवे. व्यक्तीचे एक निश्चित वय असते मात्र संस्था काम करतच राहतात. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सच्या चेअरमनपदासाठी टाटा कुटुंबियांकडे कोणताही विशेष अधिकार नाही.

टाटा ट्रस्टचे व्यवस्थापन बदलण्याच्या दृष्टीने विचार चालू असताना आणि काम चालू असताना रतन टाटा यांनी ही गोष्ट सांगितली आहे. रतन टाटा विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांची समिती तयार करू शकतात. यात तत्वज्ञान व मानव्यशास्त्र क्षेत्रातील अनेक लोकांचा समावेश असू शकतो.

टाटा सन्समध्ये टाटा कुटुंबियांची ३ टक्के पेक्षा कमी भागीदारी आहे. कुटुंबियांना कसलाही विशेष अधिकार किंवा भूमिका दिलेली नाही. दरम्यान एयर इंडियानंतर आता आणखी एक सरकारी कंपनी टाटा समूहाची होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी निलांचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेडला १२,१०० कोटी रुपयांना विकण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. NINL हा ओडिसा सरकारच्या दोन कंपन्यांचा संयुक्त उपक्रम आहे.

या उपक्रमामध्ये चार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या MMTC लिमिटेड, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, BHEL आणि MECON लिमिटेड यांचा समावेश आहे. NINL चा कलिंगनगर, ओडिशा येथे ११ लाख टन क्षमतेचा पोलाद कारखाना आहे. पण ही कंपनी मोठ्या तोट्यात चालली आहे. त्यामुळे या कंपनीचा प्लांट ३० मार्च २०२० पासून बंद आहे.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड आणि टाटा स्टील लॉन्ग प्रोडक्ट्स लिमिटेड (टीएसएलपी) या कंपन्या एनआयएनएल खरेदी करण्यासाठी प्रमुख दावेदार होत्या. या सर्व कंपन्यांनी NINL कंपनी विकत घेण्यासाठी आर्थिक बोली लावली होती. पण त्यामध्ये टाटा स्टील कंपनीने बाजी मारली.

या आर्थिक व्यवहारात टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP) लिमिटेड सर्वात मोठी बोलीदार म्हणून उदयास आली. सरकारने NINL साठी ५,६१६.५७ कोटी रुपयांची राखीव किंमत निश्चित केली होती. ज्यासाठी TSLP ने बोली दुप्पट केली. NINL मध्ये सरकारचा कोणताही भागभांडवल नाही, त्यामुळे विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात त्याचा कोणताही वाटा असणार नाही.

हे सर्व पैसे सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्या आणि राज्य सरकारच्या दोन सार्वजनिक उपक्रमांच्या खात्यात जातील. निलांचल इस्पात निगम लिमिटेड ओडिसा राज्यात स्थित आहे. टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेड ने NINL च्या खरेदीसाठी सर्वाधिक १२,००० कोटी रुपयांची बोली लावली. सरकारने त्याच्या विक्रीसाठी ५,६१६. ५७ कोटी रुपयांची राखीव किंमत निश्चित केली होती.

केंद्र सरकारच्या कंपन्यांचे NINL चे हे दुसरे यशस्वी खाजगीकरण आहे. या यादीतील पहिली कंपनी एअर इंडिया होती, जी अलीकडेच टाटा समूहाने विकत घेतली आहे. टाटांनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी १८,००० कोटी रुपयांची बोली लावली होती. एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने १२,१०० कोटी रुपयांची राखीव किंमत निश्चित केली होती.

महत्वाच्या बातम्या
वडिलांच्या ‘या’ त्यागामुळे शेख राशिद झाला टिम इंडियाचा उपकर्णधार, वाचा त्यागाची आणि चिकाटीची कहाणी
सलाम! ८ महिन्यांच्या बाळाला छातीला लावून गावोगावी करते लसीकरण, ‘या’ आईसमोर कोरोनाही होईल फेल
लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ते वेदनादायक तीन महिने; मृत्यूच्या दारातून आल्या होत्या परत
लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ते वेदनादायक तीन महिने; मृत्यूच्या दारातून आल्या होत्या परत

इतर

Join WhatsApp

Join Now