Share

तुझ्यात अनेक दोष आहेत, पण…; विराटच्या राजीनाम्यानंतर अनुष्काची धक्कादायक पोस्ट

भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे. विराटच्या या निर्णयानंतर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने एक भावनिक पत्र लिहिले आहे.

त्यात तिनं विराटच्या या प्रवासाची माहिती दिली आहे. ती म्हणते,” २०१४ची गोष्ट आजही मला आठवतेय. महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि तू मला सांगितलेस की मी कसोटी संघाचा कर्णधार बनणार आहे. दुसऱ्याच दिवशी तू, MS आणि मी गप्पा मारत होतो आणि तेव्हा तुझ्या दाढीचे केस आतापासूनच राखाडी होत असल्याचे गमतीनं MS म्हणाला. आपण सर्व तेव्हा भरपूर हसलो होतो.

त्यादिवसापासून तुझ्या दाढीचे केस राखाडी होताना मी पाहतेय. मी तुझ्यातली वाढ पाहिली आहे, अफाट वाढ. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो भारताच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून तुझ्या वाढीचा आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघानं मिळवलेल्या यशाचा मला  सार्थ अभिमान आहे. परंतु, त्याहीपेक्षा तुझ्यात अंतरंगात झालेल्या वाढीचा मला अधिक अभिमान आहे.”

ती पुढे लिहिते,”२०१४मध्ये तू तरुण आणि भोळा होतास. तू अनेक आव्हानांना सामोरे गेलास, ती आव्हान फक्त मैदानावरची नव्हती. हे खरं आयुष्य आहे, याची जाण तुला झाली. पण, मला हे सांगताना आनंद होतोय की तू तुझ्या चांगल्या हेतूनं सर्व आव्हानं यशस्वीरित्या पार केलीस.

तू एक उदाहरण तयार केलंस आणि तुझ्या एनर्जीनं तू प्रत्येकामध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण केलीस. काही वेळा तू हरलास, पण त्यावेळी तुझ्या बाजूला बसून मी तुझ्या डोळ्यांतील अश्रू पाहिले आहेत. अजून  चांगल करता आलं असतं, असं तुला त्यावेळी वाटायचं. हा असाच तू आहेस आणि तुला इतरांकडूनही अशीच अपेक्षा आहे.”

दरम्यान, पुढे अनुष्का लिहिते, ‘तू परिपूर्ण नाहीस आणि तुझ्यातही काही दोष आहेत पण तू ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला आहे का? तू जे केलंस ते म्हणजे नेहमी योग्य गोष्टीसाठी उभे राहणे, कठीण गोष्टीसाठी उभं राहणं, नेहमी! तू लोभापायी काहीही धरून ठेवले नाही, हे पदंही नाही आणि मला ते माहित आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीला घट्ट धरून ठेवते तेव्हा ती व्यक्ती स्वतःला मर्यादित करते. आणि तू अमर्याद आहेस. तू या ७ वर्षांत जे शिकलास ते आपल्या मुलीला तिच्या वडिलांमध्ये दिसेल. तू चांगलं केलंस.’

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ धक्कादायक कारणामुळे किरण मानेंना मालिकेतून काढले; वाहिनीने सांगितले वेगळेच सत्य
धक्कादायक! प्रसिद्ध कथ्थक सम्राट बिरजू महाराजांचे निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
तारक मेहता… शोमध्ये बबिताजींना टक्कर देण्यासाठी आली ‘ही’ बोल्ड अभिनेत्री; फोटो पाहून उडेल झोप

आंतरराष्ट्रीय इतर खेळ बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now