Share

प्रमाणापेक्षा छोटी मोमोकिनी घालून अनुष्का सायकलवर करत होती ‘हे’ चाळे, विराटने काढला व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) काही दिवसांपूर्वी पती विराट कोहली ( Virat Kohli) आणि मुलगी वामिकासह सुट्टीवरून परतली आहे. अनुष्काने याआधीच व्हेकेशनचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते, तर आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक मस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा मुलगी वामिकासोबत मस्त स्टाईलमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.(Anushka Sharma, Virat Kohli, Wamika, Video, Private Vacation)

अनुष्का शर्माचा ऑरेंज कलरचा बिकिनी (मोमोकिनी) लूक व्हेकेशनपासून सर्वाधिक व्हायरल झाला होता. त्याचवेळी, आता अभिनेत्री त्याच लुकमध्ये सायकल चालवताना दिसत आहे. मुलगी वामिकाला मागे बसून अनुष्काने अनेक ठिकाणी सायकल चालवली. यासोबत अनुष्का व्हिडिओच्या सुरुवातीला कॅमेऱ्यांकडे एक सुंदर स्माईल देताना दिसत आहे. या प्राइवेट व्हॅकेशनवर विराट कोहलीने अभिनेत्रीचा हा व्हिडिओ शूट केल्याचे अनुष्काच्या हसण्यावरून स्पष्ट होते.

व्हिडिओमध्ये अनुष्का कधी बागेच्या परिसरात तर कधी समुद्राच्या किनाऱ्यावर सायकल चालवताना दिसत आहे. अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ नेटिझन्स खूप लाइक आणि शेअर करत आहेत. यासोबतच  कमेंट सेक्शनमध्ये अनुष्काची जोरदार प्रशंसा होत आहे.

अनुष्का शर्मा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते आणि चाहते प्रतिक्रिया देत नाहीत, असे कधीही होऊ शकत नाही. अनुष्काने मालदीव प्रवासाचा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनुष्का आणि वामिकाचे सायकलिंग व्हिडिओ यूजर्सना खूप आवडले. कुणी व्हिडीओला क्यूट म्हटले तर कुणी कौतुकात शब्द कमी पडत आहे असेही म्हटले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. झुलन ही भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. जानेवारी २०२२ मध्ये अनुष्का शर्माने या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. अनुष्काचा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
बिकीनी घालून वामिकाला सायकलवर फिरवताना दिसून आली अनुष्का शर्मा; लोक म्हणाले
अनुष्का शर्माने केली रणवीरची पोलखोल; म्हणाली, रणवीर खूपच घाणेरडा, त्यामुळेच मी त्याला..
तेव्हा मला खुप राग येतो, अनुष्का शर्मासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीर सिंगने सोडले मौन
जेव्हा रणवीरने अनुष्का शर्माच्या प्रायवेट पार्टवर केली होती ही अश्लील कमेंट, अशी होती कोहलीची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now