Share

‘असे न केल्यास आम्हाला आनंद होईल’, वामिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का भडकली

vamika kohali

विराट कोहली (virat kohali) – अनुष्का शर्माचे(anushka sharma) लाडकी मुलगी वामिका आताच वर्षाची झाली आहे. विशेष बाब म्हणजे वामिकाच्या जन्मानंतर अजूनही विराट – अनुष्काने तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केलेले नाहीये. मात्र एका सामन्याच्या दरम्यान वामिकाचा फोटो घेण्यात आला. तो आता व्हायरल होत आहे. (anushka sharma on vamikas viral photo news)

याच पार्श्वभूमीवर अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं असं म्हटलंय की, ” काल स्टेडिअममध्ये असताना आमच्या मुलीचे फोटो क्लिक करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.’

‘आम्ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, आम्हाला अचानक कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यात आलं. कॅमेरा आमच्यावर आहे, याची आम्हाला माहीत नव्हती. या विषयावर आमची भूमिका आणि विनंती पूर्वीसारखीच आहे. वामिकाचे फोटो क्लिक करून सोशल मीडियावर व्हायरल न केल्यास आम्हाला आनंद होईल. याचं कारण आम्ही आधीच सांगितलं आहे. धन्यवाद,” असे अनुष्काने पोस्ट करत म्हंटले आहे.

दरम्यान, यावरच विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराट कोहली म्हणतो, “आम्हाला कळालं आहे की काल मैदानावर आमच्या मुलीचा फोटो घेण्यात आला आणि तो वेगाने व्हायरल होत आहे.”

“आम्हाला सांगायचं आहे की आमचं त्यावेळी लक्ष नव्हतं आणि कॅमेरा आमच्याकडे आहे याची आम्हाला जाणीव नव्हती. यावर आमची भूमिका आणि विनंती आधीप्रमाणेच असेल. वामिकाचे फोटो कोणीही घेऊ नये, प्रसिद्ध करू नये. त्यासाठीची कारणं आम्ही यापूर्वीही दिली आहेत,” असे विराटने सांगितले आहे.

दरम्यान, जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडिया आणि इत्यादी गोष्टींची समज येत नाही तोवर तिला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा मानस विराट कोहली आणि अनुष्का यांनी याआधीच बोलून दाखवला होता. त्याबाबत दोघं वारंवार खूप काळजी देखील घेत असल्याचं दिसून येतं.

महत्त्वाच्या बातम्या
कुंकू लावायच्या आधीच नवरीला कळलं नवरदेवाचं ‘ते’ सीक्रेट, मंडपातून माघारी पाठवली वरात
भयानक! वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना महिलेचा मृत्यु, कारण वाचून धक्का बसेल
lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण
अरे वा! पुष्पा’नंतर आता अल्लू अर्जुनच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटालाही आवाज देणार श्रेयस तळपदे

आंतरराष्ट्रीय इतर खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now