Share

प्रियांका चोप्रा आई झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…

anushka sharma

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर, प्रियांका चोप्राने स्वतः ही आनंदाची बातमी (Priyanka and Nick welcome baby)चाहत्यांना दिली, ज्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत. प्रियांकाच्या या सरप्राईजने चाहतेही खूप खूश आहेत. (anushka sharma congratulates priyanka chopra and nick jonas)

लग्नाच्या 3 वर्षानंतर प्रियंका आणि निक जोनासच्या घरी पालणा हलला आहे. प्रियांका सरोगसीद्वारे आई झाली आहे. प्रियांकाला आई व्हायची इच्छा होती, याचा खुलासा तिनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियांका आणि निकचे अभिनंदन केले आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने प्रियांका आणि निकचे अभिनंदन केले आहे. “प्रियांका आणि निक तुमचे खूप खूप अभिनंदन. आता रात्री जागण्यासाठी तयार राहा. त्यासोबतच भरपूर आनंद आणि प्रेमासाठी सज्ज व्हा. तुमच्या बाळाला खूप प्रेम,” असे अनुष्का म्हणाली. त्यासोबत अनुष्काने दोन हार्ट इमोजीही त्या पोस्टमध्ये लिहिले आहेत.

दरम्यान, प्रियांकाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली. पुढचे काही दिवस प्रायव्हसी हवी आहे. कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. आपण भावनांचा आदर कराल; असा विश्वासही चाहत्यांना उद्देशून प्रियांका चोप्राने व्यक्त केला आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत राहिलेले हे दांपत्य आता आई-बाबा झाल्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आहे.

प्रियांका-निक आई-बाबा झाल्याचे कळल्यापासून चाहत्यांनी तसेच दांपत्याला ओळखणाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रेटी पण आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी, पूजा हेगडे, लारा दत्ता यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दांपत्याचे अभिनंदन केले.

सरोगसीच्या पर्यायाची निवड करून अपत्यप्राप्ती करून घेण्याचा पर्याय अनेक सेलिब्रेटींनी निवडला आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरूख खान, आमिर खान, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर अशा अनेकांनी सरोगसीच्या पर्यायाची निवड केली आहे. या यादीत आता प्रियांका चोप्रा-निक जोनास या दांपत्याचाही समावेश झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
घरी कोणीही नसताना १० वर्षांच्या मुलाने घरातच घेतली फाशी, टीव्हीवर रोज पाहायचा क्राईम पेट्रोल
‘मी केवळ पार्टीसाठी आणि पैसै उधळण्यासाठी लग्न केले’, अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा
विशाल फटे स्कॅम: ८ दिवस चौकशी केल्यानंतर विशाल फटेने केला मोठा खुलासा, म्हणाला..
राष्ट्रवादीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपसोबत केली हातमिळवणी, धनंजय मुंडेना धक्का

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now