अलीकडेच अभिनेत्रीने तिचे टॉपलेस फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून अभिनेत्रीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. अनुषा दांडेकरने नुकतेच एक लेटेस्ट फोटोशूट केले आहे. तिने हे फोटोशूट एका कॉस्मेटिक ब्रँडसाठी केले आहे. या फोटोशूटमध्ये अनुषा पूर्णपणे टॉपलेस दिसत आहे.(anusha-dandekar-became-topless-for-the-ad-shoot)
तिने स्वतःला समोरच्या बाजूने मोठ्या गोल कॅपने झाकले आहे. अनुषा काचेच्या फरशीवर बसून शूट करत असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. तिच्या मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिने या लुकसोबत न्यूड मेकअप(Nude makeup) केला आहे. पोनी तिला या लूकमध्ये खूप सूट करते.
फोटोशूटमध्ये अनुषा(Anusha Dandekar) वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देत आहे. अनुषाचे हे टॉपलेस फोटोशूट(Topless photoshoot) तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. अनुषाच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.
एक काळ असा होता की टीव्ही जगतात लोक अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांच्या प्रेमाची चर्चा करायचे. ‘लव्ह स्कूल’ या रिअॅलिटी शोदरम्यान दोघे प्रेमात पडले. मात्र, त्यांची प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
अनुषा ‘MTV House of Style’, ‘MTV Dance Crew’, ‘MTV Teen Diva’, ‘MTV News’ आणि ‘MTV Love School’ सारख्या शोमध्ये दिसली आहे. अनुषाने ‘मुंबई मॅटिनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.