anurag kashyap statement on nagraju manjule | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची आजही चर्चा होते. त्यांच्या या चित्रपटाने फक्त मराठी प्रेक्षकांनाच नाही, तर संपूर्ण बॉलिवूडलाही वेड लावले होते. त्यामुळे त्याचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला होता.
बॉलिवूडच्या काही दिग्दर्शकांनी सुद्धा नागराज मंजुळे यांचे कौतूक केले होते. असे आता अनुराग कश्यपने मोठं वक्तव्य केले आहे. अनुराग कश्यप हा वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. आता त्याने नागराज मंजुळे यांच्या सैराटवर वक्तव्य केले आहे. त्यांनी नागराज मंजुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अनुराग कश्यप नुकताच एका कार्यक्रमात आला होता. त्यावेळी त्याने वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. त्याने मराठी चित्रपटांवरही भाष्य केले आहे. तो म्हणाला की, नागराज मंजुळे यांच्या सैराटने मराठी सिनेमा उद्ध्वस्त केला आहे.
अनुराग कश्यप म्हणाला की मी नागराजला फोन लावला होता. मी त्याला म्हणालो की, तुला माहितीये का सैराटने मराठी सिनेमा उद्ध्वस्त केला आहे? म्हणजेच सैराटने मिळवलेले यश. सिनेमातून खुप पैसा कमावतो येतो हे नागराजने सैराटमधून लोकांना दाखवून दिले आहे.
तसेच पुढे तो म्हणाला की, सैराट सुपरहिट गेल्यामुळे अचानक उमेश कुलकर्णी आणि इतरांनी त्यांच्या प्रकारचे चित्रपट बनवणे बंद केले. कारण त्यांना पुढे सैराटची कॉपी करायची होती. अनुराग कश्यचपे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत असून चित्रपट चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
यावर्षी कांतारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला आहे. देशभरात या चित्रपटाचे कौतूक केले जात आहे. पण अनुराग कश्यपने कांतारा चित्रपट दिग्दर्शित केलेल्या ऋषभ शेट्टीला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला आहे की, कांतारा हिट ठरला आहे. पण बॉक्स ऑफिसकडे लक्ष ठेवून त्याने बिग बजेट सिनेमे बनवायला सुरुवात केली तर ते योग्य राहणार नाही. कारण चित्रपट बनवण्याचा त्याचा दृष्टीकोन आधीसारखा राहणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
supriya sule : महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ निर्णयामुळे संतापला ठाकरे गट
सूर्यकुमार यादवचं संघात पुनरागमन, पृथ्वी शॉही करणार धमाका; अजिंक्य रहाणेकडे सोपवलं कर्णधारपद
west bengal : आधी कृष्णभक्तीला विरोध, नंतर म्हणायचा मुस्लीम कबुल कर; रशियन तरुणीने घटस्फोट घेत हिंदू तरूणाशी…