Share

आता तर आपली ताकद दाखवाच; केजरीवालांनी कश्मीर फाईल्सवर टिका केल्यानंतर अनुपन खेरांनी थोपटले दंड

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट संपूर्ण देशभरात वादाचा विषय बनला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाला अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे. परंतु या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला आहे. अशात “ज्या व्यक्तींचे मत आहे की, हा चित्रपट करमुक्त व्हावा त्यांनी या चित्रपटाला यूट्यूबवर अपलोड करावे” असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

त्यांच्या या वक्तव्याला अभिनेता अनुपम खैर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनुपम खैर यांनी ट्विट करत, ‘मित्रांनो आता तर द कश्मीर फाइल्स हा चित्रपट चित्रपटगृहामध्येच जाऊन पाहा. तुम्ही 32 वर्षानंतर #KashmiriHindus यांचे दु:ख जाणून घेतलं. त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचार पाहिला. लोक या दुःखद घटनेची चेष्टा करत आहेत. कृपया त्यांना आपली ताकद दाखवा.’ असे आवाहन प्रेक्षकांना केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी शेम या हॅशटॅगचा वापर करत केजरीवाल यांना सुनावले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाला हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशसह इतर राज्यांत करमुक्त करण्यात आले आहे.

आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, काश्मीर फाईल्सनंतर आता गोधरा हत्याकांडवरती चित्रपट बनविण्याची विनंती नेटकऱ्यांनी विवेक अग्नीहोत्रींना केली आहे. परंतु सध्या विवेक अग्नीहोत्री ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरच वेब सिरीज आणण्याच्या विचारात आहेत.

https://twitter.com/AnupamPKher/status/1507030918367625217?t=ou_nUmWJINrSH1pvSbXRTw&s=19

मात्र दुसरीकडे ते चित्रपटावर टीका करणाऱ्या लोकांना सुनावताना देखील दिसत आहेत. नुकतेच अशा लोकांना खडसावून सांगताना, ‘हा चित्रपट राम आणि रावण यांच्यातील फरक दाखवतो. मी दहशतवाद्यांबद्दल का बोलू? त्यापेक्षा मी मानवतेचे समर्थन करणाऱ्या लोकांना या दहशतवाद्यांना पराभूत करण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सांगेन.’ असे विवेक अग्निहोत्रींनी म्हटले आहे.

तसेच, हा चित्रपट २ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि हा वर्गीकरण करणारा किंवा फूट पाडणारा चित्रपट आहे असे म्हणणारा माणूस तुम्हाला सापडणार नाही. दहशतवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या नातवाचे दुबईमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचे फोटो झाले व्हायरल, चर्चांन उधाण
अभ्यासाला लायब्रेरीत जाते म्हणाली अन् OYO हॉटेलमध्ये गेली, पुढे जे घडलं ते वाचून धक्का बसेल
‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..
या चित्रात तुम्ही पहिल्यांदा काय पाहिले? त्यावरूनच कळेल तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे? क्लिक करा आणि जाणून घ्या…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now