अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलिवूडमधील जबरदस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. सध्या अनुपम त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मात्र, एक वेळ अशी आली की त्यांनी ऑडिशन देण्यासाठी पैसे चोरले होते. ही गोष्ट आहे अनुपम खेर यांच्या कॉलेजच्या दिवसांची. तेव्हा ते हिमाचल प्रदेशात राहत होते. पंजाब युनिव्हर्सिटीत ऑडिशन देण्यासाठी अनुपमने एके दिवशी आईचे 118 रुपये चोरले होते.(Anupam Kher once stole Rs 118 from the temple)
2018 मध्ये एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी याबद्दल सांगितले होते. आई-वडिलांकडून भाड्याचे पैसे मागण्याची हिंमत नाही, म्हणून पैसे चोरल्याचे त्यांनी सांगितले होते. ऑडिशनच्या जाहिरातीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 200 रुपये मिळतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनुपमचे हे कृत्य समजल्यानंतर त्याच्या आईने त्यांच्या कानाखाली मारली.
अनुपम खेर यांचे शालेय शिक्षण शिमल्यात झाले. तथापि, त्यांनी चंदीगड पंजाब विद्यापीठात थिएटर शिकण्यासाठी महाविद्यालय सोडले. नंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून ग्रॅज्युएशन केले. अनुपम खेर म्हणाले होते की, ‘मी खेळात माहीर नव्हतो. मी ज्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले ते नाटक होते. जेव्हा मला हिमाचल विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा मी शिमल्याच्या शासकीय महाविद्यालयात शिकत होतो.
भारतीय रंगभूमी विभागाची जाहिरात पाहिल्यावर मी त्या विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्रवेश घेतला होता. चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाची ती जाहिरात होती. ते विद्यार्थ्यांना वॉक-इन मुलाखतीसाठी बोलावत होते आणि निवडलेल्या मुलांना 200 रुपये शिष्यवृत्ती देत होते. आईबाबांना विचारायची हिम्मत होत नव्हती. म्हणून मी माझ्या आईने मंदिरात ठेवलेले 118 रुपये चोरले आणि पंजाब विद्यापीठात गेलो.
ते पुढे म्हणाले की, ‘मला आठवतं की तिथे मुला-मुलींसाठी वेगवेगळे सीन होते. मी मुलीचा सीन पाहिला आणि केला. बळवंत गार्गी त्या पॅनेलमध्ये होते, ज्यांनी सांगितले की माझी कामगिरी खूपच खराब होती पण डेरिंग चांगली होती. संध्याकाळी घरी आल्यावर आई-वडिलांनी पोलिसांना फोन केल्याचे दिसले. माझ्या आईने मला विचारले की मी पैसे घेतले आहेत का आणि मी स्पष्टपणे नकार दिला.
एका आठवड्यानंतर माझ्या वडिलांनी मला त्यांच्याकडे बोलावून विचारले, ‘त्या दिवशी तू कुठे गेला होतास?’ मी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली, त्यानंतर माझ्या आईने मला जोरदार चापट मारली. माझे वडील तिला म्हणाले ‘काळजी करू नका, तो 200 रुपयांची शिष्यवृत्ती घेऊन येत आहे. तेव्हा तुला 100 रुपये परत करील. तेव्हा मला माझ्या प्रवेशाची माहिती मिळाली.
अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्चला रिलीज होणार आहे. याशिवाय ते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या ऊंचाई या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि परिणीती चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.
महत्वाच्या बातम्या-
देवदूत! भर युद्धात 2424 किमी बाईक चालवत पोहोचला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्या आवश्यक वस्तू, औषधे
रशिया-युक्रेन युद्धात आता सोनम कपूरची उडी; म्हणाली, या युद्धात भारतीय लोकांना दोन्ही बाजूंनी..
..त्यामुळे साताऱ्यातील आपशिंगे गावाला मिलिटरीने थेट रणगाडाच दिला भेट, गावात जल्लोषाचे वातावरण
मणिपूर आणि गोव्यात कोणाचे सरकार येणार? एबीपी न्यूज-सी वोटर ओपिनीयन पोलमधून झाला खुलासा