Share

अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर

Anupam Kher

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोमवारी त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांना चाहते आणि कलाकारांसोबत अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान अनुपम यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करत स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवशी त्यांनी एक निर्णय घेतल्याचेही एका पोस्टद्वारे सांगितले.

अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते शर्टलेस असून त्यांची बॉडी फ्लॉन्ट करताना दिसून येत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘वाढदिवसाच्या मला स्वतःला शुभेच्छा. आज मी माझा ६७ वा वर्ष सुरु करत आहे. मी माझ्यासाठी ठेवलेले नवीन ध्येय तुम्हाला सांगण्यासाठी खूपच उत्सुक आणि प्रेरित आहे. मागील दोन वर्षात माझ्यात हळूहळू झालेल्या प्रगतीचे हे दोन फोटो उदाहरण आहेत’.

पुढे त्यांनी लिहिले की, ‘३७ वर्षांपूर्वी तुम्ही एका तरूण अभिनेत्याला भेटला होता. त्याने एका वेगळ्या अंदाजात त्याच्या करिअरची सुरुवात केली होती आणि ६५ वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये एक कलाकाराच्या रूपात सर्व मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक स्वप्न मात्र माझ्या मनात नेहमीच होतं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात मी कधीही काहीही केलं नाही’.

अनुपम यांनी त्यांच्या स्वप्नाबाबत सांगताना लिहिले की, ‘हे स्वप्न म्हणजे माझ्या फिटनेसकडे गांभीर्याने पाहणे आणि स्वतःला एका बेस्ट वर्जनमध्ये पाहणे आणि अनुभवने. मी माझ्या फिटनेस प्रवासाच्या मार्गावर चालणे सुरू केलं आहे. आणि हा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छित आहे. मी माझे चांगले आणि वाईट दिवस तुमच्याशी शेअर करेन. तसेच आशा आहे की, एका वर्षानंतर आपण एकत्र मिळून माझ्यातील एका नव्या व्यक्तीला पाहू. यासाठी मला शुभेच्छा द्या’.

अनुपम खेर यांनी त्यांच्या या पोस्टद्वारे सांगितले की, त्यांच्या वाढदिवशी फिटनेसकडे गांभीर्याने पाहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर त्यांच्या या प्रवासासाठी त्यांचे चाहते खूपच खुश आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहते अनेक कमेंट करत त्यांच्या नव्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच त्यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ते ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दिसणार आहेत. ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कथा दाखवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
ब्रेकींग! झुंड चित्रपटाच्या विरोधात न्यायालयात याचिका; निर्मात्याला कोर्टाने ठोठावला १० लाखांचा दंड
नागराज मंजूळेंवर टीका करणाऱ्या शेफाली वैद्यांना नेटकाऱ्यांनी झापलं; म्हणाले, क्यूँ हिला डाला ना…
पती रूममध्ये आला आणि.., लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भन्नाट किस्सा

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now