दाक्षिणात्य अभिनेता स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनने ‘पुष्पा’ या आपल्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाने प्रत्येकाचे मन जिंकून घेतले आहे. दक्षिणेसोबत संपूर्ण भारतातील प्रेक्षकांचे ‘पुष्पा’ चित्रपटाने भरपूर मनोरंजन केले. चित्रपट पाहिलेले प्रेक्षक अल्लू अर्जूनचे कौतुक करताना थकत नाहियेत. यादरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांनीही ‘पुष्पा’ चित्रपट पाहून अल्लू अर्जूनचे भरभरून कौतुक केले (Anupam Kher Compliments to allu arjun)आहे. तसेच भविष्यात अल्लू अर्जूनसोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करत अल्लू अर्जूनचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘पुष्पा चित्रपट पाहिला. खऱ्या अर्थाने हा एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट आहे. पूर्ण पैसा वसूल चित्रपट आहे. तसेच प्रिय अल्लू अर्जून तू एक रॉकस्टार आहेस. चित्रपटातील तुझी प्रत्येक गोष्ट आणि अभिनय खूप आवडले. आशा आहे की, लवकरच मी तुझ्यासोबत काम करेन. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. जय हो’.
Watched #Pushpa!! BLOCKBUSTER of a film in real sense. Larger than life, high on adrenal and full paisa Vasool. And dear @alluarjun you are a #Rockstar!! Loved every nuance & attitude of yours. Hope to work with you soon. A big CONGRATULATIONS to the whole team! Jai Ho!👏😍👏🙌 pic.twitter.com/DJjYKWSzzU
— Anupam Kher (@AnupamPKher) January 28, 2022
अनुपम खेर यांच्या या ट्विटवर अल्लू अर्जूननेही कमेंट करत त्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, ‘अनुपमजी तुमच्याकडून हे कौतुकाचे शब्द ऐकून मी भारावून गेलो आहे. यासाठी मी कृतज्ञ आहे. मलासुद्धा आशा आहे की, मी लवकरच तुमच्यासोबत काम करेन. तुमच्या या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद’.
https://twitter.com/alluarjun/status/1487300361669201925?s=20&t=5h4n0xMVvPW58K-Ktl0JBw
दरम्यान, ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर कमी वेळातच चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले. प्रेक्षकांची या चित्रपटाला खूप पसंती मिळाली. चित्रपटाची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट प्रदर्शित केला. सुरुवातील दाक्षिणात्य भाषेत आणि नंतर हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला हा चित्रपट ओटीटीवरही खूपच गाजला.
अल्लू अर्जूननेही चित्रपटातील आपल्या डायलॉग, डान्स, स्टाईल आणि अॅक्शनद्वारे अल्लू अर्जूनने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्याच्या या अभिनयाची जादू सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांवर चढली. दररोज सोशल मीडियावर कोणी ना कोणी या चित्रपटासंबंधित व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात.
‘पुष्पा’ हा चित्रपट आंध्रप्रदेशमधील शेषाचलम भागातील जंगलाच्या चंदन तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनने पुष्पाराज नावाच्या ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. एक सामान्य मजूर ते तस्करीच्या साम्राज्याचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात रंजकपणे दाखवण्यात आले आहे. तर पहिल्या भागानंतर आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
अमृता फडणवीसांनी ‘नॉटी’ म्हणत ठाकरे सरकारच्या नेत्यांवर साधला निशाणा; म्हणाल्या…
पॉवर स्टार पुनित राजकुमारसाठी साऊथ इंडस्ट्रीने उचलले मोठा पाऊल, त्याच्या शेवटच्या चित्रपटावेळी..
katrina kaif ने शेअर केले बिकीनीवरील Photos, विक्की कौशलशिवाय मालदीवमध्ये करतेय ऍन्जॉय