राजकीय नेत्यांकडे नेहमीच आपण आदराने पाहत असतो. मात्र काही नेत्यांची काही प्रकरण अशी असतात की, ती चांगलीच चर्चेत येतात. असंच एक प्रकरण सध्या चांगलच गाजतंय. हे प्रकरण आहे अभिनेता-लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांच. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..?
सध्या ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेता-लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांचा घटस्फोट चर्चेत आहे. अनुभव हे बीजेडीचे खासदार आहेत. या दोघांचा हायप्रोफाईल घटस्फोट सध्या चर्चेत आला आहे. यांचं प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेलं आहे.
२०१४ मध्ये मोठ्या आनंदात या दोघांचे लग्न झाले होते. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागले आणि बघता बघता हे प्रकरण कोर्टात गेले. या प्रकरणावर कोर्टाने नुकताच एक आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार मोहंती यांनी पत्नी वर्षाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने आदेश देताना म्हंटले आहे की, ‘वर्षा प्रियदर्शिनी यांना अनुभव मोहंती यांचे वडिलोपार्जित निवासस्थान दोन महिन्यांत रिकामे करावे. त्याचबरोबर अनुभव मोहंती यांनी वर्षाला देखभालीसाठी दरमहा 30 हजार रुपये देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यामुळे आता या प्रकरणाला आणखीच वेगळे वळण लागले आहे.
दरम्यान, वाचा खासदार मोहंती यांनी याचिकेत काय म्हंटलं आहे, ‘लग्नाला वर्षे लोटली तरी देखील ती शरीरसंबंध ठेवायला देत नाही. अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र नेहमीच निराश झालो, असे मोहंती यांनी याचिकेत म्हटले होते. तसेच वर्षा प्रियदर्शिनी यांनी देखील मोहंती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘मोहंती हा दारुडा आहे आणि त्याची अनेक लफडी आहेत, असे तिने तिच्या याचिकेमध्ये म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रियदर्शिनी यांनी पती त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. तसेच अनैतिक संबंधांचे आरोपही केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
‘विक्रम’ चित्रपटातील कलाकारांनी घेतले कोट्यवधींचे मानधन; आकडा वाचून डोळे फिरतील
“आम्ही योगींनाच मत दिलं तरी त्यांनी आमच्या ५० वर्ष जुन्या घरावर बुलडोजर चालवला”
मी जुही, काजोल, उर्मिला, शिल्पासोबत बेडवर…; शाहरुख खानने केला धक्कादायक खुलासा
कश्मीरमध्ये पाकडे भारतीयांच्या हत्या करताहेत अन् हा भारतीय क्रिकेटर त्यांच्यासोबत खेळायला तडफडतोय