Share

क्लार्कच्या घरी अँटी करप्शनची रेड; आता सगळंच घबाड सापडेल या भितीने प्यायलं विष

मध्यप्रदेशमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या एका लिपिकाच्या घरी धाड टाकली. त्या धाडीमध्ये तब्बल ८५ लाख रुपयांची रोकड त्यांना या कर्मचाऱ्याच्या घरी आढळली. (Anti-corruption raid at Clark’s house)

वैद्यकीय विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या केसवानी या कर्मचाऱ्यासंबंधी तक्रार आल्याने ही कारवाई करण्यात आली. केसवानी या कर्मचाऱ्याच्या घरी पथक तपासासाठी पोहोचले. तेव्हा त्याने धक्काबुक्की केली.

आपला भ्रष्टाचार आता उघड होण्याच्या भीतीने पथकाचा तपास सुरू असतानाच घाबरलेल्या या कर्मचाऱ्याने बाथरूम क्लीनर प्यायले. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

अधिकाऱ्यांना तपासावेळी सापडलेली रोकड मोजण्यासाठी चक्क मशीन घेऊन यावी लागली. घरात सापडलेल्या इतर कागदपत्रानुसार सुमारे साडेचार कोटी रुपयांची इतर संपत्ती त्याच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले.

हा लिपिक सध्या ज्या घरात राहत आहे. त्या घराची किंमत दीड कोटींच्या घरात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एवढा मोठा भ्रष्टाचार हा कर्मचारी राजरोसपणे करत असल्याने त्याच्यावर मोठी कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

केसवानी हा लिपिक नोकरीला रुजू झाल्यावर ४ हजार पगार त्याला होता. आता ५० हजार प्रतिमहिना एवढा पगार तो घेत आहे. या अशा पद्धतीने या कर्मचाऱ्याची एवढी मिळकत नसताना मोठ्या रकमेचं घबाड त्याच्या घरी सापडल्याने पथकातील अधिकारी देखील हैराण झाले होते.

महत्वाच्या बातम्या-
सुप्रीम कोर्टातील घडामोडींनी बंडखोर अस्वस्थ; शिंदेंनी बोलावली सर्व ५० आमदारांची तातडीची बैठक
PM Modi: विरोधक पडले विचारात, २०२४ साठी मोदींनी चालवले ब्रम्हास्त्र, ED ला दिले ‘हे’ आदेश, जाणून घ्या समीकरण
आम्ही तिरंगा कधीच स्वीकारणार नाही, संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवणाऱ्यांवर RSS ने केली होती केस

 

ताज्या बातम्या आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now