मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्याने भाजप नेते आता सत्तेत आले आहेत.
आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने अख्ख ठाकरे सरकार कोसळलं. तर आता बंडखोर आमदार उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.
राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या गटात उभे असलेले काही आमदार लवकरच शिंदे गटात सामील होतील, असं सूचक व्यक्तव्य सामंत यांनी केल आहे. तर दुसरीकडे कोकणातील एका शिवसेना आमदाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीसोबत बैठक केल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे आता सामंत यांनी केलेलं व्यक्तव्य खरं ठरणार का? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. कोकणात देखील उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असल्याच बोललं जातं आहे. उद्धव ठाकरे गटातील कोकणातील या आमदाराने फडणवीसांच्या एका जवळच्या व्यक्तीसोबत नरिमन पॉईंट येथे भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान ठाकरे यांच्या गटातील हा नेता ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चिन्हे दिसून आली. यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार असल्याच स्पष्ट दिसतं आहे. तर दुसरीकडे उदय सामंत यांनी आजच ठाकरे गटातील आमदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे नागपुरातील सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काशीकर यांनी शिवसेना सोडल्यामुळे पक्षाला नागपुरात मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादांनी तानाजी सावंतांना जागा दाखवली; विधानसभेत सावंतांच्या फजितीचीच चर्चा
पुन्हा नवा ट्विस्ट! भाच्याने केला खळबळजनक दावा; “…अन् तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”
Aditya Thackeray : भाजपमध्ये सुद्धा आहेत आदित्य ठाकरेंचे जबरा फॅन; थेट पुरावाच आला समोर
34 years of imprisonment : एक ट्विट पडले महागात; महिलेला ठोठावली तब्बल ३४ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, वाचा पुर्ण प्रकरण…