क्रूझ ड्रग्ज प्रकरणात NCB कडून क्लीन चिट मिळाल्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shaharukh Khan) मुलगा आर्यन खानला आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट परत करण्याच्या आर्यनच्या याचिकेवर मुंबईतील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.(another-relief-given-to-aryan-khan-by-the-mumbai-special-court-in-the-cruise)
आर्यन खानचा(Aaryan Khan) पासपोर्ट परत करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने कोर्ट रजिस्ट्रीला दिले आहेत. यासोबतच आर्यनला परदेशात जाण्याची परवानगीही मिळाली आहे. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्याच्या मुलाचा पासपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला होता.
आर्यन खान गेल्या वर्षी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात(Cruz drugs case) अडकला होता. यामुळे 2 ऑक्टोबर 2021 रोजी त्याला पोलिस कोठडीतही घेण्यात आले आणि 28 दिवस तुरुंगात काढावे लागले. अनेक महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर एनसीबीने गेल्या महिन्यात आर्यनला क्लीन चिट दिली.
पुराव्याअभावी आर्यनला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. यानंतर आर्यन खानने विशेष न्यायालयाकडे पासपोर्ट(Passport) परत करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली, त्यावर न्यायालयाचा निर्णय आला.
पासपोर्ट प्रकरणी झालेल्या सुनावणीत आर्यन खानच्या बाजूने निकाल लागला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने आर्यनचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यन खानने जामिनाच्या अटींनुसार कोर्टात पासपोर्ट जमा केला होता.
30 जून रोजी एनसीबीकडून क्लीन चिट(Clean chit) मिळाल्यानंतर आर्यन खानने विशेष न्यायालयात अर्ज केला होता, ज्यामध्ये त्याने कोर्टाकडून पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती. आर्यन खानच्या याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी त्याला पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी आर्यन खानचे वकील अमित देसाई(Amit Desai) यांनी सांगितले की, एनसीबीने आर्यन खानला आधीच क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणी आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा नाही. आता या प्रकरणी आर्यनच्या विरोधात कसलाही तपास नसल्यामुळे त्याचे जामीनपत्र रद्द करून पासपोर्ट परत करण्यात यावा.