Share

फडणवीसांचा आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब, वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं, राजकारणात खळबळ

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीसांनी हा पेनड्राइव्ह आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या पेनड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे.(Another pendrive bomb of Fadnavis, Dawood’s men on Waqf board)

त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची माणंस मुस्लीम वफ्फ नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर आला आहे. पुढे ते म्हणाले की, नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. मी पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत आहे.

या पेनड्राइव्हमधील दोन व्यक्तींची नावं डॉ. मुदाससीर लांबे आणि मोहम्मद अर्षद खान अशी आहेत. या दोघांना वक्फ बोर्डावर नियुक्त करण्यात आले आहे. एका महिलेने दोघांपैकी मुदाससीर लांबे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. मात्र महिलेच्या पतीला चोरीच्या आरोपातून अटक करण्यात आली आहे. तो सध्या तुरुंगात आहे.

डॉ. लांबे : माझी अडचण माहिती आहे का? माझे सासरे दाऊदचे राईट हँड होते. सुरुवातीला माझं नातं हसिना आपाने जोडलं होतं. माझ्याकडून सोहेल भाऊ होते आणि तेथून हसिना आपा होत्या. हसिना आपा या दाऊदच्या बहीण आहेत. हसिना आपा आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी. म्हणजे दाऊदची वहिनी.

अर्शद खान : तू त्यांच्यासोबत अन्वरचं नाव तर ऐकले असेल. ते माझे काका आहेत. तेदेखील त्यांच्यासोबत राहत होते. म्हणजे सुरुवातीपासून राहत होते. आताच त्यांचं निधन झाले आहे.

डॉ. लांबे : माझे सासरे संपूर्ण कोकण बेल्ट सांभाळतात, ब्लॅक बेल्ट होते आणि संपूर्ण तेच पाहायचे.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बेमध्ये माझे काका होते आणि तेच सर्व पाहायचे. तेव्हा मी मदनपुरात होतो. भेंडी बाजार येथे माझा जन्म झाला.

डॉ. लांबे : अर्शद मी तर म्हणतो की, तू आताच वक्फमध्ये काम सुरू कर. सध्या आपल्याकडे पावर आहे. आता हवे तितके पैसे कमवू शकतो. पूर्ण वक्फमध्ये काम सुरू कर. कमवण्याचं सेटिंग कर, अर्धे पैसे तूझे अर्धे माझे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांना पुन्हा एकदा निशाण्यावर धरले आहे. अद्याप राज्य सरकारमधून कोणीच यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या
‘हे’ कारण देत हिजाबवरील बंदी हायकोर्टाने कायम ठेवली; कोर्ट म्हणाले…
टाटा ग्रुपचे ‘हे’ चार शेअर्स आहेत राकेश झुनझुनवालांचे आवडते शेअर्स, देणार बक्कळ परतावा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now