महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. दरम्यान, राज यांनी मंगळवारी सायंकाळी जारी केलेल्या पत्रकामध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी, असं म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे, रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे भोंगे हटवण्यासाठी मनसेने आणखी एक आंदोलन छेडले आहे. मनसे आता डिजिटल स्वाक्षरी अभियान सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. या माध्यमातून मनसे आता महाविकास आघाडी सरकारची कोंडी करणार असल्याच बोललं जातं आहे. याबाबत मनसे ट्विट केलं आहे.
तर जाणून घेऊया या अभियानाबद्दल… मनसेनं गुगल फॉर्मद्वारे जनतेची डिजिटल स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये मनसेने नागरिकांना काही प्रश्न विचारले आहेत. या मनसेच्या अभियानाला किती प्रतिसाद मिळतोय हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1521753305806176256?s=20&t=Sd2UiiH8ixTl42ig6EYI7w
मनसेने या माध्यमातून काही सवाल उपस्थित केले आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले पाहिजेत या मागणीला तुमचे समर्थन आहे का?, भोंगे या विषयावर तुमचे मत, शहर, परिसर, गावाचे नाव, तुमचे नाव, संपर्क क्रमांक असा पूर्ण फॉर्म भरून सब्मिट करायचा आहे. मनसेने याबद्दल ट्विटकरून माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: मुलीला छेडणं कपील शर्माला पडलं महागात, कपिलच्या दिली कानाखाली, वाचा संपूर्ण प्रकरण
…अन् डिलिव्हरी बॉयला ‘त्या’ अवस्थेत पाहून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला; वाचा नेमकं काय घडलं
…त्यामुळे त्याला सकृतदर्शनी बलात्कार म्हणता येणार नाही, न्यायालयाने गणेश नाईकांना दिला अटकपूर्व जामीन
आमच्या सणांना एक दिवसाची परवानगी, मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी मिळाली? राज ठाकरे आक्रमक