Share

मोदींचा आणखी एक मास्टस्ट्रोक; पेट्रोल डिझेल पाठोपाठ घरगुती गॅसही २०० रूपयांनी स्वस्त होणार

कोरोना आणि त्यानंतर वाढलेली महागाई यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. पेट्रोल, डिझेल तसेच गँसच्या किंमती दिवसेंदिवस वाढू लागल्या. मात्र, आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महागाईच्या झळा बसत असताना मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे.

आज मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आणखी एक आनंदाची बातमी दिली ती म्हणजे, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसह सिलेंडरच्या किंमती देखील कमी केल्याची बातमी समोर येत आहे. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे आता, पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर एलपीजी सिलेंडरमध्ये 200 रुपयांची कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता सिलेंडरच्या किंमतीत कपात होणार, या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार याबद्दल जाणून घेऊ.

माहितीनुसार, सध्या सिलेंडरचे दर 1000 रुपयांच्या वर गेले आहेत. पण उज्ज्वला योजनेतील जी कुटूंबीय असणार त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर 200 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेतील कुटूंबीयांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.

तर, दुसरीकडे पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी नुकतीच घोषणा केली आहे.

माहितीनुसार, सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि आता केंद्र सरकारने या गोष्टी स्वस्त केल्या.

आर्थिक

Join WhatsApp

Join Now