एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंड केलं, आणि भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती आहे. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. याआधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत आपल्या सोबत सूरतला २० आमदारांचा गट सोबत नेला होता. यात अपक्ष आमदारही सहभागी होते. त्यानंतर हा आकडा ३० पर्यंत गेला.
हे सगळे आमदार नंतर गुवाहाटी येथे गेले. त्यानंतर शिंदे गटात शिवसेनेचा एक एक आमदार दाखल होत हा आकडा 39 वर गेला. शिवसेनेतील एकतृतियांश आमदार फुटल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला. सध्या शिंदे गटासोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्ष असे ५० आमदार आहेत.
असे असताना आता, शिवसेना खासदारांची देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. आमदारांप्रमाणेच शिंदे गट दोन तृतीयांश खासदारांचा गट तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसणार असे बोलले जात आहे. दरम्यान, काहीही करा पण भाजपसोबत चला. आपण भाजपसोबत गेलो नाही तर त्याचा मोठा फटका आम्हा सगळयांनाच बसेल, असा आग्रह शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे धरला .