शनिवारपासून आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली असून आपल्या पहिल्या सामन्यातच दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडिन्सला हरविले आहे. परंतु या पराभवानंतर मुंबई इंडिन्सला आणखीन एक फटका बसला आहे. सामन्यादरम्यान मुंबईकडून एक मोठी चूक झाल्यामुळे या चुकीचा फटका कॅप्टन म्हणून रोहित शर्माला सहन करावा लागला आहे.
सुरु असलेल्या सामन्यावेळी रोहितने ठराविक वेळेत मर्यादित ओव्हर न टाकल्यामुळे त्याला आयपीएलने 12 लाखांचा दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नियमाप्रमाणे एका तासात ठराविक ओव्हर टाकल्या जाणे हे अपेक्षित असते.
मात्र कॅप्टन असून रोहितला स्वतः वर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने जास्त ओव्हर करत नियमांचे उल्लंघन केले. त्याची ही चुक आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या लक्षात येताच त्यांनी रोहितवर कारवाई केली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत रोहितवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
यासंबंधीत आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने ट्विट करत “मुंबईने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ओव्हर रेट कायम राखला नाही. या मोसमात मुंबईकडून ही चूक होण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड सुनावण्या आला आहे” अशी माहिती दिली आहे.
पहिल्या सामन्यातच पराभव झाल्यानंतर मुंबई इंडिन्सला आणखीन एक तोटा सहन करावा लागला आहे. दरम्यान मुंबईने सुरुवातीला बॅटींग घेत 178 रनांचे लक्ष ठेवले होते. यावेळी रोहितने 41 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. तर इशान किशनने फलंदाजी करत 81 धावा काढल्या.
त्याने यावेळी 48 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. परंतु दिल्ली संघाने बाजी मारत मुंबईचा दणदणीत पराभव केला. दिल्ली संघाकडून ललित यादव आणि अक्षय पटेलने शानदार खेळी खेळली.
महत्वाच्या बातम्या
“आज खरंच बाबा हवे होते”; अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत भावूक झाला मुलगा वरद
अभिनेता विल स्मिथने ऑस्करच्या मंचावरच निवेदकाला चोपले; पत्नीचा अपमान सहन झाला नाही
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, ‘या’ डॉक्युमेंट्रीला मिळालं नामांकन
आता हिंदू देखील अल्पसंख्याक होणार; मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली ‘ही’ माहिती