Share

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; मुंबईतील ‘या’ बड्या शिवसेना नेत्याचं शिंदे गटाला समर्थन

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली, आणि राज्यातील ठाकरे सरकार कोसळून शिंदे नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेतील गळतीला सुरुवात झाली.

बहुसंख्य आमदारांसोबतच खासदार देखील शिवसेना सोडून शिंदे गटात जात आहेत. अजूनही शिवसेनेतील ही पडझड सुरूच आहे. आता माजी आमदार अशोक पाटील यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. अशोक पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटाला समर्थन दिलं आहे.

हे समर्थन देताना त्यांनी शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. पाटील म्हणाले, शिवसेनेत माझा अपमान सुरू होता. मला प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात येत होते. मी शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात होत्या. पण यापूर्वीही मला उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर ठेवण्यात येत होतं.

मी उद्धव ठाकरे यांना काही तरी सांगेल या भीतीने मला दूर ठाकरेंजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे मी नाईलाजाने शिंदे गटाला समर्थन देत आहे. मी घेतलेला हा ठाम निर्णय आहे. आता मागे पुढे राहायचं नाही, असे अशोक पाटील हे शिंदे गटाला समर्थन देताना बोलले.

तसेच म्हणाले, गेले कित्येक वर्ष मी शिवसेनेचे काम करत होतो. त्यामुळे मी आमदार झालो. मात्र माझा अपमान करणे कार्यक्रमांना न बोलवणे आदी प्रकार सुरू होते. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला फिरणारी मंडळी या कुरापती करत होत्या. मला आपणास्पद वागणूक मिळत होती.

याबाबत मी अनेक वेळा पक्षश्रेष्ठीशी बोललो होतो. पण त्याची दखल घेतली गेली नाही असेही पाटील म्हणाले. तसेच विनायक राऊत यांच्याबाबत बोलताना म्हणाले, विनायक राऊत यांनी देखील विक्रोळीमध्ये बैठक लावून माझ्या बाबत गैरसमज पसरवण्यचां काम केलं. मला काही तरी मिळेल म्हणून मी शिंदे गटात जात असल्याच्या वावड्या विनायक राऊत यांनी उडवल्या. तसेच माझ्या लोकांनाही धमकावण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now