shinde group : सर्व राजकीय पक्षांना उरून पुरणारा शिवसेना पक्ष आता धोक्यात आल्याने पक्षातील जेष्ठ नेते मंडळी चिंतेत आहेत. एकीकडे शिवसेनेला गळती लागल्याच पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे आगामी महानगर पालिका तोंडावर आल्यात. यामुळे सध्या शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
अशातच अहमदनगर महापालिकेतील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. खरं तर, अहमदनगर महापालिकेत शिवसेनेचे २३ नगरसेवक आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे. राज्यात सत्तांतर होताच आठ ते दहा नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याच बोललं जातं.
समजा, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आठ ते दहा नगरसेवक शिंदे गटात गेल्यास शिवसेनेला धक्का बसणार आहे. आगामी अहमदनगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे आणखी ८ ते १० नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं संकेत शिंदे गटातील नेत्याने दिले आहेत.
यामुळे आता अहमदनगर महापालिका निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितलं आहे की, मनपातील शिवसेनेचे आणखी आठ ते दहा नगरसेवक माझ्या संपर्कात असून त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. तो त्यांना दिला आहे.’
दरम्यान, अनिल शिंदे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यामागील कारण देखील स्पष्ट केलं आहे. अनिल शिंदे यांनी सांगितलं आहे की, ‘माझी पत्नी शीला शिंदे तसेच सुरेखाताई कदम व रोहिणी शेंडगे यांना महापौर करण्यात मुख्यमंत्री शिंदेंचा वाटा आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांसोबत आहे, असं अनिल शिंदे यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी भाजप नेत्यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेनेने देखील चांगलीच तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे पदाधिकाऱ्यांकडून महीलेची फसवणूक; महीलेने थेट राज ठाकरेंना अडवून न्यायासाठी पसरला पदर
Dussehra gathering : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी, कारण..; मनसेने केली मागणी
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका ; १० लाखांचा दंडही ठोठावला, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
Police : ‘यापुढे खाकी वर्दी घालून नाचल्यास खैर नाही’; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांना कठोर निर्देश