Share

संतापजनक! बलात्कार प्रकरणातील आरोपीसाठी बजरंग दलाचा पोलीस ठाण्यात तुफान राडा, पोलिसांना केली जबरी मारहाण

पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कॉन्स्टेबलला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडा पोलीस स्टेशन-39 मध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीचे कारण म्हणजे, पोलिसांनी एका तरुणाला बलात्काराच्या कथित आरोपाखाली ताब्यात घेतले होते, त्या तरुणांच्या समर्थनार्थ काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला.

या दरम्यान, पोलीस आणि बजरंग दलाचे काही कार्यकर्ते यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि नंतर पोलिस स्टेशनच्या बाहेर एलआययू कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली, त्यानंतर प्रकरण तापले. घटनास्थळी दाखल झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस दलाने प्रकरण शांत केले.

माहितीनुसार, गोंधळ घालणाऱ्या आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचे एडीसीपिने म्हटले आहे. तपासात जे काही समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी सेक्टर 39 येथील पोलिस स्टेशन परिसरात एका मुलीचे अपहरण झाले होते. पोलिसांना मुलगी सापडली तेव्हा मुलीने पोलिसांना तिच्यावर बलात्कार झाला असून, ती गर्भवती असल्याचे सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.

या तरुणाच्या समर्थनार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. अनेक तास हा गोंधळ सुरूच होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना इतर ठाण्याचे पोलीस देखील बोलवावे लागले. याप्रकरणी नोएडा पोलिसांचे एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात घुसलेल्या लोकांनी पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.

तसेच म्हणाले, या प्रकरणी पोलिसांनी एक नाव आणि 50-60 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे आता येथील बजरंग दलाच्या गुंडगिरीवर आणि सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now