तेलंगणामध्ये एका 13 वर्षांच्या चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेलंगणामध्ये खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात आणले गेले होते.
त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून या अल्पवयीन मुलीवर तब्बल 80 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 80 नराधमांना अटक केली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आठ महिन्यांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी पाठवले जात होते. जून 2021 मध्ये कोरोना काळात आईचा मृत्यू झाल्यामुळे या पीडित मुलीला सवर्ण कुमारी या महिलेने दत्तक घेतले होते. ही महिला पीडित मुलीच्या वडिलांना काही न सांगता मुलीला घेऊन आली होती.
त्यामुळे यासंदर्भात जवळील पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या सवर्ण कुमारीची ओळख पटवली. कुमारीला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडून पीडित मुलीविषयी माहिती काढण्यात आली. कुमारीने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सुरुवातीला दहा जणांना अटक केली.
यानंतर या सर्व प्रकरणात आणखीन लोक सहभागी असल्याचे समजतात त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली. हा तपास सुरू असतानाच त्यांना पीडित मुलगी मिळाली. या मुलीने दिलेल्या जबाबातूनच तिच्यासोबत झालेले घाणेरडे कृत्य उघडकीस आले आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये 35 दलाल आहेत. तर बाकीचे ग्राहक आहेत.
सध्या मुलीची प्रकृती नाजूक असल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती देताना, मुलीच्या वयाचा आणि स्थितीचा फायदा घेऊन, अनेक टोळ्यांनी मुलीला विकत घेतले आणि विविध ठिकाणी नेले आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले असल्याचे तपासात सहभागी असणाऱ्या पोलिसांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
बेकायदेशीर बांधकाम तोडत होते अधिकारी; कम्युनिस्ट नेत्याने दिले बुल्डोझर थांबवण्याचे आदेश, म्हणाल्या…
मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या ‘या’ व्यक्तीने दिलाय KGF मध्ये यशला आवाज, वाचा इथपर्यंतचा प्रवास
“मागच्या २ वर्षात मंदीर मशीद सगळे आवाज बंद होते, फक्त ॲम्बूलन्सचाच आवाज ऐकू यायचा, यातून बोध घ्या”
हनुमान जयंती मिरवणुकीत हिंसाचारात झालेल्या जहांगीरपुरीत घरे-दुकानांवर बुलडोझर