Share

…तर शरद पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा; कॉंग्रेस नेत्यानेच पक्षाला दिला मोलाचा सल्ला

ठाकरे सरकार सत्तेतून गेल्यापासून शिवसेनेच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कॉंग्रेसच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच नुकताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला.

तर आता कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दमनकारी धोरणापासून देश वाचवायची गरज लक्षात घेत कॉंग्रेसने पक्षांतर्गत असणारे प्रश्न तातडीने सोडवावेत, असं चव्हाण यांनी म्हंटलं आहे.

अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, आझाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चिंतन करावे आणि कारभारात सुधारणा करावी, असाही मोलाचा सल्ला चव्हाण यांनी आपल्याच पक्ष श्रेष्ठींना दिला आहे.

तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल देखील चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. ‘प्रादेशिक पक्ष कॉंग्रेससारखे देशव्यापी नाहीत. मात्र, आज पंतप्रधानपदाचा उमेदवार कॉंग्रेसकडे नसेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचेनाव समोर करून सर्वपक्षीय ऐक्य साधले गेले पाहिजे, असा सल्ला चव्हाण यांनी दिला आहे.

दरम्यान, ‘कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडला जावा. मात्र राहुल गांधी किंवा त्यांचे निकटवर्तीय निवडून येऊन अध्यक्ष, पदाधिकारी झाल्यास हरकत नाही. पण निवडून आलेल्या व्यक्तीलाच नैतिक अधिष्ठान असते, हे विसरू नये,’ असं चव्हाण यांनी म्हंटलंय.

२० जून रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने आपल्या संख्याबळाहून एक अधिकची जागा निवडून आणली होती. तर काँग्रेसच्या पहिल्या क्रमाकाच्या उमेदवाराचा पराभवाचा धक्का बसला होता. त्यावेळी काँग्रेसच्या ११ आमदारांनी  क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या ७ आमदारांनी भाजपकडून पैसे घेऊन त्यांना मतदान केल्याचं धक्कादायक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. या प्रकरणी मी कारवाईची मागणी केली होती. ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

मात्र यावर काय कारवाई होते याची आम्ही वाट पाहात असल्याचं चव्हाण यांनी सांगितले. तसेच म्हणाले, काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद आहे. चव्हाण यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल

Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now