आपल्या स्वरांनी देशावासियांनाच नव्हे तर सातासमुद्रापलिकडील रसिकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी काल जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा, युगाचा अस्त झाला. लतादीदींच्या निधनाने भारतीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
तर दुसरीकडे अभिनेत्री अंकिता लोखंडेला (ankita lokhande) मात्र याहे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे लता मंगेशकर यांच्या निधनाने सर्वजण दु: खात असताना, दुसरीकडे मात्र अंकिता लोखंडे ही आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाली. सध्या अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.
या व्हिडीओमध्ये अंकिता पती विकी जैनसोबत कारमध्ये ‘बिजली बिजली’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. लता यांच्या निधनानंतर तासाभरात तिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.
दरम्यान, ‘अरे काही तर लाज बाळग, हे सर्व उद्याही करू शकतेस,’असं एका युजरने लिहिलं. ‘मूर्ख मुली, लताजी सुद्धा इंदूरच्या आहेत आणि तू पण. काही तर लाज ठेव,’अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अक्षय कुमारपासून ते भूमी पेडणेकर, निमृत कौर, विशाल ददलानी, दिया मिर्झा आणि हंसल मेहतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लताजींना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लताजींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
तसेच सरकारला मान्यवरांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी आणि ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर ‘रहस्य’ उलगडले! महिला डॉक्टर वाजेंचा घातपातच; थंड डोक्याने केलेल्या ‘या’ मर्डरचा झाला पर्दाफाश
लता मंगेशकर यांची प्रकृती पुर्णपणे ठिक झाली होती, पण…; डॉक्टरांनी सांगितले लतादिदींच्या मृत्युचे खरे कारण
१००० पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढू शकत नाही, पाकिस्तानातून लता मंगेशकरांना श्रद्धांजली
१९८३ चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या खेळाडूंना द्यायला BCCI कडे नव्हते पैसे, तेव्हा लता दीदींनी दिले होते २० लाख