Share

‘तू माझ्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाहीस’; अंकिता लोखंडेने अमृता खानविलकरसाठी लिहिली खास पोस्ट

Amruta Khanvilkar

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आगामी ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अमृताने नृत्यांगणा चंद्रमुखीची भूमिका साकारली आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. तर याच गाण्याचं पोस्टर अभिनेत्री अंकिता लोखंडेने शेअर करत अमृता खानविलकरबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने अमृताचे कौतुक करत ती तिच्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नसल्याचे म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

अंकिताने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘अम्मू मला आपल्याबद्दल लोकांना खूप काही सांगायचे आणि बोलायचे आहे. आणि आज ही संधी घेऊन मी पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छित आहे की, तु माझ्यासाठी स्टार किंवा सेलिब्रिटी नाहीस. तर तू एक सच्ची कलाकार आहेस. एक अशी कलाकार जी तिच्या कलेच्या सादरीकरणाद्वारे आपल्याला हसवते किंवा रडवते’.

अंकिताने पुढे लिहिले की, ‘मला आठवतंय की, जेव्हा आपण दोघी ‘झी सिने स्टार की खोज’ या शोमध्ये होतो. तेव्हा आपल्या दोघींमध्ये कोण चांगलं डान्स करेल, यासाठी नेहमी स्पर्धा असायची. पण तुलाही माहित आहे की, मी नेहमीच एक चांगली डान्सर आहे. बरोबर ना अम्मू? हा झाला विनोदाचा भाग. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा मी तुझा पोस्टर लाँच पाहिला तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुला तिथे पाहणे एखाद्या स्वप्नासारखं होतं आणि ज्या पद्धतीने ते पोस्टर लॉन्च करण्यात आलं ते फक्त वॉव असं होतं’.

‘त्या पोस्टरवर दिसणारी माझ्यासाठी अमृता नव्हती तर ती चंद्रमुखी होती. तुझ्या कौतुकाची ही पोस्ट अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अम्मू आणि आज तुला तिथे पाहणे खूप अभिमानाचे वाटत आहे. तुझा हा प्रवास अद्भुत आहे आणि मी खरोखर या मुलीला घडताना पाहिलं आहे. अशी मुलगी जी एक चांगली मुलगी, चांगली बहिण, चांगली पत्नी, चांगली मैत्रीण आणि एक अद्भुत कलाकार आहे. तू खरोखरच यास पात्र आहेस. मला खात्री आहे की, तुझ्यापेक्षा काकूला तुला तिथे पाहून अधिक आनंद झाला आहे’.

‘इंडस्ट्रीत तु तुझा ठसा उमटविण्यासाठी खूप मेहनत घेतलीस आणि केवळ प्रतिभेवर विश्वास ठेवणाऱ्या अशा प्रतिभावान लोकांसोबत तू काम करत आहेस याबद्दल खूप छान वाटत आहे. तु प्रत्येक यशास पात्र आहेस. तुला आणखी खूप मोठा पल्ला गाठायाचा आहे अम्मू. तुला आणि ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. तुला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. देव सदैव तुझ्या पाठिशी राहू देत. जशी आहेस तशीच राहा. लव्ह यू अमृता खानविलकर’.

दरम्यान, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. अमृतासोबत या चित्रपटात आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. आदिनाथने या चित्रपटात दौलत देशमाने ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट म्हणजे राजकारणात मुरलेला दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रमुखी यांच्या प्रेमाची कथा आहे. २९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
गुरूवारी ‘द काश्मिरी फाईल्स’ने केली आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई, ‘एवढ्या’ कोटींचा टप्पा केला पार
‘दिलेली शिक्षा भोगायला तयार’ ऑस्करमधील वादानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ‘या’ संस्थेतून झाला पायउतार
‘मी त्यांना भीक मागायला सोडू शकत नाही’ म्हणत अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडित कुटुंब घेतले दत्तक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now