मागील अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये लगीन घाई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल याने लग्न केले. त्यानंतर टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि बॉयफ्रेंड विक्की जैन यांचे १४ डिसेंबर २०२१ ला लग्न झाले. अंकिता आणि विक्कीचे शाही पद्धतीने करण्यात आले. लग्न झाल्यापासून हे जोडपं नेहमी चर्चेत असते.
अंकिताच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. १३ डिसेंबर २०२१ ला यांचा संगीत समारंभ आयोजित केला होता. यामध्ये या जोडप्याचे संपूर्ण कुटुंब नाचताना दिसून आले. इतकेच नव्हे तर अंकिताच्या आईनेही मनमोकळेपणाने डान्स केला. अंकिताने काही वेळापूर्वी संगीत समारंभाचे फोटो शेअर केले होते.
अंकिताने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या संगीत सोहळ्याचे काही न पाहिलेले फोटो आहेत. या फोटोमध्ये या दोघांचे भावना दिसून येत आहेत. या फोटोमध्ये अंकिता लेहेंगा आणि स्लीव्हलेस चोली घातलेली आहे. या लेहंग्यावर मोती आणि आरशाचे काम देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर विक्की जैन पांढरा शर्ट आणि काळे जॅकेट घातलेले आहे. त्याच्या जॅकेटवर हेवी एम्ब्रॉयडरी वर्क देखील केले आहे.
इतकेच नव्हे तर, हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये पतीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अंकिताने लिहिले की, “माझे हृदय गेले ह्मम ह्मममम ह्म.” त्याचबरोबर तिच्या पोस्ट वर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट करत तिच्या चाहत्यांनी या जोडीला क्यूट म्हंटले आहेत. इतकेच नव्हे तर तिच्या सौंदर्याचे कौतुक देखील केले आहे.
याअगोदर ही अंकिताने तिच्या प्री-वेडिंग शूटचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर विक्कीने देखील तिला मॅचिंग आउटफिट्स घातले आहेत. या फोटोमध्ये दोघे ही खुप छान दिसत आहेत.
हे फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी पूर्णपणे, निश्चितपणे, सकारात्मकपणे, निर्विवादपणे, कोणत्याही शंका पलीकडे, तुझ्यावर प्रेम करते.” त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दाखवले आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.