छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या प्रोफेशनल लाईफसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. नुकतीच काही महिन्यांपूर्वी अंकिताने बिझनेसमॅन विकी जैनसोबत (ankita lokhande and vicky jain) लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अंकिता आणि विकीने नवी कार खरेदी केली आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंकिता आणि विकी नवी कार घेत असल्याचे दिसून येत आहेत. नवीन कार घेतल्यामुळे दोघेही फारच खुश आहेत दोघांनी त्यांचा हा आनंद केक कापून साजरा केला आहे. यावेळी अंकिताची आईसुद्धा तिथे उपस्थित असून त्या कारची पूजा करताना दिसून येत आहेत.
अंकिता आणि विकीने आलिशान बेंज वी-क्लास एलडब्ल्यूबी मर्सिडीज कार घेतली आहे. वी २२०D ची ही सर्वात महागडी कार आहे. या लग्जरी मर्सिडीज कारची किंमत जवळपास १.१० कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर अंकिता आणि विकीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास अंकिता लवकरच ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेत दिसणार आहे. यासोबतच सध्या ती पती विकीसोबत स्टार प्लस वाहिनीवरील ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये सहभागी झालेली दिसत आहे. नुकतीच या शोदरम्यान तिने सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलल्यामुळे माध्यमात चर्चेत आली होती.
दरम्यान, अंकिता आणि विकीचा १४ डिसेंबर २०२१ मुंबईत शाही अंदाजात विवाहसोहळा पार पडला होता. मेहंदी, साखरपुडा आणि हळदी समारंभानंतर त्यांचा लग्नसमारंभ पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नानंतरही अंकिता माध्यमात सातत्याने चर्चेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘या’ अभिनेत्रीने धारण केला अर्धनारीश्वरचा अवतार; लोकं हात जोडत म्हणाले…
बॉलीवूडची बोल्ड ब्युटी मल्लिका शेरावतने शेअर केले सोशल मिडीयाला आग लावणारे फ़ोटो; पाहून थक्क व्हाल
थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या.., रितेश देशमुखने पावनखिंड चित्रपटाचे केले तोंडभरून कौतुक