छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नामुळे फारच चर्चेत आली होती. अंकिता १४ डिसेंबर २०२१ रोजी बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर आता अंकिता पुन्हा एकदा माध्यमात चर्चेत आली आहे. नुकतीच एका मुलाखतीत बोलताना अंकिताने विकीसोबत लग्न करण्यामागचे कारण सांगितले (ankita lokhande about marriage) आहे.
अंकिताने नुकतीच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली होती. यावेळी तिने विकी जैनसोबतच्या लग्नाबाबत मोकळेपणाने बोलली. तसेच केवळ पार्टी करण्यासाठी तिने विकी जैनसोबत लग्न केल्याचे सांगितले. अंकिताने म्हटले की, ‘लग्नानंतर सलग तीन दिवस आम्ही पार्टी केली होती. आम्हाला केवळ पैसे उधळायचे होते. यासाठीच मी लग्न केले’.
यावेळी अंकिताला लग्नानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना अंकिताने तिच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नसल्याचे सांगितले. अंकिताने म्हटले की, ‘मला नाही वाटत की, लग्नानंतर माझ्या आयुष्यात कोणताही असा वेगळा बदल झाला आहे. कारण विकी आणि मी दीर्घकाळापासून मित्र आहोत. तसेच विकी माझा सपोर्ट सिस्टिम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात काही बदल झाला नाही’.
अंकिताने पुढे सांगितले की, ‘लोकांना लग्नाबाबत काय वाटते मला माहित नाही. तसेच तुम्ही एखाद्या गोष्टीकडे ज्याप्रमाणे बघता त्यावर सर्व काही अवलंबून असते. काहीजण लग्नाकडे खूप गांभीर्याने घेतात. परंतु लग्न म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडणे नव्हे तर मोकळेपणाने आयुष्य जगणे असते. लग्न करणारी दोन व्यक्ती खुश असणे महत्त्वाचे असते’, असे अंकिताने यावेळी म्हटले.
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा मुंबईत शाही अंदाजात विवाहसोहळा पार पडला होता. मेहंदी, साखरपुडा आणि हळदी समारंभानंतर त्यांचा लग्नसमारंभ पार पडला. लग्नासाठी अंकिताने प्रसिद्ध डिझाईनर मनीष मल्होत्राद्वारा डिझाईन करण्यात आलेला लेहंगा घातला होता. त्या आऊटफिट्समध्ये ती फारच सुंदर दिसत होती. रिपोर्टनुसार हा लेहंगा बनवण्यासाठी तब्बल १६०० तास लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: डेव्हिड वॉर्नरला लागले पुष्पाचे वेड, आता बनलाय पुष्पराज; चाहते म्हणाले, ‘क्रिकेट सोडून सिनेमात ये’
पुष्पा स्टाईलने ड्रग्सची तस्करी करणाऱ्या गँगचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, २८ लाखांचा गांजा केला जप्त
नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालायाचा दणका, दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश