ankit joshi resign for daughter | साधारणपणे आपल्या देशात वडिल बनल्यानंतर लोकांना १०-१२ दिवसांची सुट्टी मिळते. यानंतर, मुलाची जवळजवळ सर्व जबाबदारी आईवर येते. पण एका बापाने आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी लाखोंची नोकरी सोडली. त्यांना लहान मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. त्यांच्या मते हे एक प्रकारे त्यांच्या करिअरमधील प्रमोशन आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरचे माजी विद्यार्थी अंकित जोशी यांनी सांगितले की, आपल्या नवजात मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांनी लाखोंची नोकरी सोडली आहे. ते एका कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) होते.
ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अंकित जोशींनी आपल्या निर्णयाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, माझ्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधी मी माझी उच्च पगाराची नोकरी सोडली. मला माहित आहे की हा एक विचित्र निर्णय होता. लोकांनी मला आधीच सांगितले होते की की पुढे गोष्टी कठीण होतील, पण माझ्या पत्नीने निर्णयाला पाठिंबा दिला.
अंकित जोशी यांनी स्पष्ट केले की कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून त्यांना वारंवार प्रवास करावा लागायचा. मुलगी स्पितीच्या जन्मानंतर ती गोष्ट त्यांना करायची नव्हती. त्यामुळे माझी मुलगी जगात येण्यापूर्वीच मी ठरवले होते की मला माझा सर्व वेळ तिच्यासोबत घालवायचा आहे.
त्यांना कंपनीतून आठवड्याभराची सुट्टी मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यापासून जोशी यांनी आपला वेळ स्पितीची काळजी घेण्यासाठी दिला आहे. मुलीचे नाव असे ठेवण्यात आले कारण त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्पिती व्हॅलीच्या ट्रिपनंतर हा निर्णय घेतला की ते त्यांच्या मुलीचे नाव स्पिती ठेवणार.
अंकित जोशी म्हणाले की, ते काही महिन्यानंतर नोकरीसाठी अर्ज करणार आहे. यादरम्यान ते आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्याचा विचार करत आहे. ते पुढे म्हणाले की, मी उचललेले पाऊल सोपे नाही, कारण प्रत्येक पुरुष हे करु शकत नाही. पण मला आशा आहे की काही वर्षात या सर्व गोष्टी बदलतील.
महत्वाच्या बातम्या-
‘सुर्याच्या आजच्या इनिंगला जगात तोड नाही’; प्रतिस्पर्धी कर्णधार विलियम्सनही झाला नतमस्तक
Shubhaman gill : उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबद्दल शुभमन गिलने केला मोठा खुलासा; म्हणाला, ती हे सर्व…
mns : याचं नाव भगतसिंग नाही कळीचा नारद पाहिजे होतं; कोश्यारींच्या वक्तव्यावर मनसे भडकली