Share

Video: लॉकअपमध्ये वाहू लागले प्रेमाचे वारे, टिकटॉक स्टार अंजली ‘या’ स्पर्धकाच्या पडली प्रेमात, दिली प्रेमाची कबुली

Lock Upp

कंगना राणावतचा ‘लॉकअप’ (Lock Upp) हा शो सातत्याने चर्चेत येत आहे. शोमध्ये प्रत्येकवेळी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. तसेच शोमध्ये एकीकडे प्रत्येक स्पर्धक एकमेकांशी लढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे दोन स्पर्धक एकमेकांच्या जवळ येताना दिसून येत आहेत. हे स्पर्धक म्हणजे मुन्नवर फारूकी आणि अंजली अरोरा. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अंजली मुन्नवरकडे तिचे प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत अंजली मुन्नवरला आय लव्ह यू म्हणताना दिसून येत आहे. अंजली मुन्नवरला म्हणते की, ‘शो संपल्यानंतर मला भेटायला दिल्लीला येणार का?’ त्यावर मुन्नवर म्हणतो, ‘मी का दिल्लीला येऊ?’ नंतर अंजली म्हणते, ‘माझ्यामुळे तूला त्रास होतंय ना?’ तर मुन्नवर म्हणतो, ‘तुझ्या अगोदरपासूनच मी त्रस्त आहे’.

पुढे अंजली यावर हसत म्हणते की, ‘आता यावर काय करू शकतो?’ तर मुन्नवर म्हणतो, ‘समस्या आहे तर सहन करावंच लागणार’. तेव्हा अंजली म्हणते, ‘तुला जास्त काळ मला सहन करावं लागणार नाही’. त्यानंतर अंजली हळू आवाजात मुन्नवरला म्हणते, ‘आय लव्ह यू’. अंजलीच्या या बोलण्याने मुन्नवर सुरुवातीला लाजतो. नंतर तो म्हणतो की, ‘तुझ्या डोक्याच्या डॉक्टरला बोलावतो’. तेव्हा अंजली म्हणतो, ‘हो मला गरज आहे त्याची’.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. तर मुन्नवर आणि अंजलीचे चाहते या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते त्यावर लाईक आणि कमेंटचा भरभरून वर्षाव करत आहेत.

दरम्यान, लॉकअपशोच्या सुरुवातीपासूनच अंजली आणि मुन्नवरमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली. मागच्या वेळेस शोमध्ये जेव्हा अंकिता लोखंडे पाहुणे म्हणून पोहोचली होती तेव्हा तिनेही या दोघांची जोडी खूप क्यूट दिसत असल्याचे म्हटले होते. तसेच त्या दोघांना तिने एक स्पेशल गिप्टसुद्धा दिला. यामध्ये तिने दोघांच्या फोटोंचा कॉफी मग दोघांनाही गिफ्ट म्हणून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: सलमान खानच्या सनम बेवफामधील हिरोईनमध्ये झालेत खूपच बदल, 30 वर्षांनीही दिसते ग्लॅमरस
हाय गर्मी! मौनी रॉयचे ‘हे’ फोटो पाहून चाहते घायाळ; अदा पाहून तुमचीही नजर हटणार नाही
प्रकाश राज यांनी थेट अमित शहांना ट्विट, म्हणाले’ ‘आमची घरं तोडू नका होम मिनिस्टर’

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now