कंगना राणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) अनेकांना पसंद आला आहे. प्रेक्षकांना या शोचा विजेताही मिळाला आहे. मात्र याआधी शोमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रसंग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या शोमध्ये मुनावर फारुकी (Munawar Faruqui) आणि अंजली अरोरा (Anjali Arora) यांची मैत्री झाली आणि त्यांचे बाँडिंग चाहत्यांनाही खूप आवडले. अंजलीनेही तिच्या भावना मुनव्वरसमोर सांगितल्या, पण शोमध्ये मुनव्वरशी संबंधित (अस्पष्ट) फोटो दाखवल्यावर तिला धक्काच बसला.(Anjali Arora made a big revelation about Munnwar Farooqi)
लोकांनी अंदाज लावला की फोटोत दिसणारी प्रतिमा त्याची पत्नी आणि मुलाची आहे. तेव्हापासून दोघांच्या ‘मैत्री’मध्ये दुरावा येऊ लागला. त्यानंतर शोमध्ये असे अनेक टप्पे आले, जिथे दोघेही कधी एकमेकांच्या विरोधात तर कधी समर्थन करताना दिसले. मात्र, आता अंजलीने मुनव्वरबद्दल असे काही म्हटले आहे, की चाहत्यांची मनं तुटतील.
https://www.instagram.com/reel/CbxfsGMp0Lg/?utm_source=ig_web_copy_link
खरं तर, आता अंजलीला असं वाटतंय की मुनव्वरने या शोसाठीच तिच्याशी मैत्री केली आहे. पायल रोहतगी समोर तिने आपल्या मनाची व्यथा मांडली आणि मुनावर हा शहाणा आहे आणि त्याला कॅमेऱ्यासमोर काय बोलायचे आणि काय दाखवायचे हे त्याला ठाऊक असल्याचेही सांगितले. घडलं अस की, पायल अचानक अंजलीशी बोलू लागते आणि म्हणते, ‘मला वाटतं की शो संपल्यानंतर माझी तुझ्यासोबत मैत्री होणार आहे. मी इतर कोणाशी नाही, पण मी तुझ्याशी मैत्री करेन.’ हे ऐकून दोघेही हसायला लागतात.
दरम्यान, अंजली पायलला सांगतानाही दिसत आहे की, मुनव्वरने केवळ याच शोसाठी तिच्याशी मैत्री केली आहे असे तिला वाटते. ती म्हणते, आता फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि आम्ही अजिबात बोलत नाही. पायल विचारते, तुम्ही माझ्याशी बोलला तर त्याला काय प्रॉब्लम आहे हे मला समजत नाही. मी फ्लर्ट करत नाही.
यानंतर अंजली म्हणते, मला माहित नाही. तो कोणाशीही बोलू शकतो, जे कुल आहे, पण जेव्हा मी कोणाशी बोलते तेव्हा त्याला प्रॉब्लम होतो. त्याला ते आवडत नाही. पायल समजावते आणि म्हणते, ‘ये गेम है’. हे लोक खूप हुशार असतात. त्यानंतर अंजलीही म्हणते, ‘कॅमेरासमोर काय बोलायचे आणि दाखवायचे हे त्याला चांगलेच माहीत आहे. तो खूप शाहणा आहे.
मुनव्वर यांनी कॅमेऱ्यासमोर लॉकअप शोबद्दल सांगितले होते की, तो पुढील 6 महिन्यांपर्यंतच या शोबद्दल बोलू शकतो. अनेक आठवणी आहेत. त्याला सर्वांची उणीव भासणार आहे. आयुष्यात पुढे जाईन, पण या शोच्या आठवणी कायम राहतील, असे तो म्हणाला. त्याच वेळी, गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश देखील जेलर करण कुंद्रासोबत वॉर्डन म्हणून अलीकडेच शोमध्ये पोहोचली होती.
महत्वाच्या बातम्या-
सलमानसोबत ईद साजरी करण्यासाठी कंगनाने केला बक्कळ खर्च, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
एजंट अग्नीच्या रुपात बॉक्स ऑफिसवर आग लावायला येत आहे कंगना, पहा धाकडचा टीझर
आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ
काश्मिर फाईल्सनंतर विवेक अग्निहोत्रींची पुढची हिरोईन असणार कंगना राणावत, महत्वाची अपडेट आली समोर