बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता कपूर यांच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी त्यांनी सुनीता आणि कुटुंबाचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबत अनिलने एक प्रेमळ कॅप्शनही लिहिले आहे. अनिलने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, या खास प्रसंगी इतक्या वर्षात पहिल्यांदाच तो सुनितापासून दूर आहे.(anil-kapoor-wrote-a-romantic-note-for-sunita-on-his-wedding-anniversary)
अनिलने लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सुनीता, तू माझे सर्वस्व आहेस. आशा आहे की प्रत्येकाला आपल्या सारखे प्रेम मिळावे. तू माझ्यासोबत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी तुझ्यासोबत प्रत्येक दिवस जगतो आणि त्यामुळे मला दररोज तरुण वाटते. मला तीन प्रेमळ, स्वावलंबी आणि क्रेझी मुले दिल्याबद्दल धन्यवाद .”
अनिलने(Anil Kapoor) पुढे लिहिले की, “तू माझे हृदय आणि माझे घरही आहेस. तुझ्यापासून दूर राहणे खूप कठीण आहे आणि आज 48 वर्षांत पहिल्यांदाच असे घडत आहे, जेव्हा मी तुझ्यापासून दूर आहे. मी दिवस, मिनिटे आणि सेकंद मोजत आहे त्याच जागेवर भेटण्यासाठी जे तुझे आवडते ठिकाण आहे. मला तुझी खूप आठवण येते आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.”
अनिल आणि सुनीता(Sunita Kapoor) यांच्याबद्दल बोलायचे झाले तर दोघांचे लग्न 1984 मध्ये झाले होते. संघर्षाच्या दिवसांत अनिलकडे पैसे नसताना सुनीता त्याचा खर्च उचलत असे. जेव्हा दोघांची पहिली भेट झाली तेव्हा अनिल कपूर एक संघर्षशील अभिनेता होता आणि सुनीता एक प्रसिद्ध मॉडेल.
सुनीताला बघून अनिल तिच्या प्रेमात पडला होता. त्याला तिच्या जवळ यायचे होते, पण सुनीतापर्यंत पोचण्याचा त्याला मार्ग नव्हता. शेवटी त्याच्या मित्रांनी तिचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर दोघेही बोलू लागले. अनिल सुनीताच्या आवाजाच्या प्रेमात पडला होता.