eknath shinde : ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. आज सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्तासंघर्षावर 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याच आदेश दिले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.
आज राज्यातील सत्तासंघर्षावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. पण न्यायाधीशांनी सुनावणी सुरु होताच दोन्ही बाजूंना काही महत्त्वाचे निर्देश दिले. आणि पुढील सुनावणी चार आठवड्यांनी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी घेणार असल्याचे सांगितले. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
यावर आता ठाकरे गटातून प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी यावर भाष्य केल आहे. सध्या कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे. महापालिका निवडणुकांपूर्वीच निकाल लागावा याबद्दलचा आमचा आग्रह आहे, असंही देसाई यांनी सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलताना पुढे देसाई यांनी म्हंटलं आहे की, आमच्या वकिलांनी मांडलेल्या गोष्टी सुस्पष्ट आहेत. यामुळे न्यायालयाने टिप्पणी म्हणून का होईना काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. लोकशाही सदृढ आहे हे जगासमोर येण्यासाठी निकाल लवकर लागावा हीच आमची अपेक्षा असल्याच त्यांनी म्हंटलं आहे.
काय झालं कोर्टात..?
कोर्टाने आदेश दिले आहेत की, एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी आता 29नोव्हेंबर रोजी होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोणती तारीख द्यायची, हे सांगितलं जाईल, असे कोर्टाने आज स्पष्ट करत सुनावणी पुढे ढकलली आहे.
न्यायाधीश चंद्रचुड यांनी सांगितलं की, दोन्ही बाजूंच्या वकीलांनी समोरासमोर बसा बैठक घ्या. कुठल्या मुद्द्यावर कोण युक्तीवाद करणार हेही आपसात ठरवा. दोन दोन वकीलांनी कागदपत्रे बनवा, गोषवारा तयार करा आणि दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा सादर करा.
महत्वाच्या बातम्या
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर