Share

अंबानीच्या पोराचा साखरपुडा झाला; वाचा काय काम करतेय अंबानी कुटुंबाची सून क्रिशा शाह

krisha shha

देशातील दिग्गज उद्योगपती अनिल अंबानी(anil ambani) आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी (anmol ambani) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 12 डिसेंबर 2021 रोजी जय अनमोलने आपल्या वाढदिवसानिमित्त क्रिशा शाहसोबत इंगजमेंट केली होती. यावेळी फक्त त्यांचे कुटुंबीयच उपस्थित होते. चला जाणून घेऊया जयने ज्या मुलीशी साखरपुडा केला आहे त्या क्रिशा शाहविषयी. (anil ambanis son krisha shah)

मुंबईत जन्मलेली क्रिशा शाहचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईतुन पूर्ण झाले. क्रिशाच्या बॅचलर डिग्रीबद्दल सांगायचे तर तिने कॅलिफोर्निया विद्यापीठातून पॉलिटिकल इकॉनॉमीचा कोर्स केला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी आणि डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन भारतात परतलेल्या क्रिशाने तिच्या भावाला भागीदार बनवले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

दरम्यान, क्रिशा शाह मुंबईत राहणाऱ्या तिच्या भावासोबत DYSCO नावाची संस्था चालवते. क्रिशाच्या भावाचे नाव मिशल शाह आहे. क्रिशाची संस्था DYSCO ही सामाजिक कार्य करते. डिस्को हे एक प्रोफेशनल नेटवर्किंग अॅप आहे, जे लोकांना काम, करिअर आणि व्यवसायांचा दृष्टीकोन देण्यासाठी तयार करण्यात आलंय.

तर अनिल आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोलने धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी वारविक बिझनेस स्कूल, यूके येथून एमबीए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनमोल त्याचे वडील अनिल यांच्या कामात सहभागी झाला होता.

तसेच बिग बींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. शुभेच्छा देताना त्यांनी दोघांचा फोटोदेखील शेअर केला होता. बच्चन यांनी ट्विट करत शेअर केलेल्या फोटोत दोघेही आनंदी दिसत होते. तसेच त्या फोटोत दोघेही अंगठ्या फ्लॉंट करताना दिसले. वाढदिवशी टीना अंबानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनमोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये बलात्कार, आणि नंतर…
मुंबईत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, युपीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चारही आरोपींना अटक
डोंबिवली: परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी, रुग्णवाहिकेला बाजू देण्यास दिला नकार; व्हिडिओ व्हायरल
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत अडकला विवाहबंधनात; पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो

आंतरराष्ट्रीय आर्थिक इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now