पुणे : पुण्यातील वाघोलीचा मल्ल अभिजीत कटके याने रविवारी हैदराबाद येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रतिष्ठेचा ‘हिंद केसरी’ किताब पटकावला. भारतीय पारंपारिक शैली कुस्ती संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतिम सामन्यात अभिजीतने हरियाणाच्या सोमवीरचा ४-० असा पराभव केला.
अभिजीत पुण्यातील शिवरामदादा तालमीमध्ये सराव करतो. 2017 मध्ये भूगाव येथे झालेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावली. त्यानंतर आता अभिजीत हिंद केसरीचा चॅम्पियनही ठरल्याने राज्यभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मात्र एकामागून एक स्पर्धा जिंकणाऱ्या अभिजीत कटकेने या लाल मातीच्या खेळासाठी कुटुंबासह अनेक त्याग केले आहेत. अभिजीत कटकेने हिंद केसरीचा किताब पटकावल्यानंतर त्याची आई भावूक झाली. कुस्तीच्या सरावामुळे अभिजीत गेल्या 17 वर्षांपासून माझ्यापासून दूर आहे.
आम्ही फक्त हिंद केसरीचे स्वप्न पाहिले होते आणि तेही आता अभिजीतने पूर्ण केले आहे. यामुळे मला इतका आनंद झाला आहे की तो शब्दात व्यक्त करता येणार नाही अशा शब्दात अभिजीतच्या आईने आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
अभिजीत हा पुण्यातील गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत कुस्तीपटू आहे. पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा हा मुलगा. अभिजीत कुस्तीमध्ये त्याच्या कुटुंबातील पाचव्या पिढीतला आहे. त्यांना अमर निंबाळकर, भरत म्हस्के, हणमंत गायकवाड, गुलाब पटेल यांचे मार्गदर्शन लाभते.
अभिजीतने 2015 मध्ये ‘युवा महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला होता. त्यानंतर 2016 मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. आपली ताकद आणि सर्जनशीलता यांची सांगड घालून कुस्ती जिंकण्याची अभिजीतची ‘रणनीती’ गेल्या काही काळापासून कमालीची यशस्वी ठरत आहे.
दीनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत बसण्याचा मान अभिजीतला मिळाला आहे, ज्यांनी युवा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद अशी दोन्ही विजेतेपदे जिंकली आहेत.
दरम्यान, भारतीय पारंपारिक शैली कुस्ती संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत अभिजीत पुण्याचा दुसरा हिंद केसरी ठरला. यापूर्वी हा मान योगेश दोडके याने पटकावला होता. दुसरीकडे मॅटवर झालेल्या स्पर्धेत पुण्याच्या अमोल बराटेने एका वर्षात हिंद केसरीचा किताब पटकावला.
महत्वाच्या बातम्या
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
kolhapur : धक्कादायक! कुस्तीच्या सरावानंतर घडलं विपरीत; पंढरपुरच्या पहिलवानाचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत
Bindass kavya : बिंदास काव्याचं भांडं फुटलं! फॉलोवर्स वाढवण्यासाठी स्वत:च झाली बेपत्ता, घरच्यांनीही केली मदत