Share

‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित न केल्यास आग लावू म्हणत हिंदू परीषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाला…

सध्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटासंबंधित अनेक वाद निर्माण झालेले पाहिला मिळत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील आग्रा येथील चित्रपटगृहात हा चित्रपट न लावल्याने राष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.

राष्ट्रीय हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थेट आग्रा येथील चित्रपटगृहच बंद करून टाकले आहे. या चित्रपटगृहाने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे यावर संतप्त होऊन कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहालाच टाळे लावले. यावेळी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

तसेच जर ‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित करण्यात आला नाही तर आम्ही चित्रपटगृहाला आग लावू अशी देखील धमकी कार्यकर्त्यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या मते , हा चित्रपट सर्वत्र दाखवण्यात आला तर नागरिकांना त्यावेळची काश्मिरी पंडितांची स्थिती समजेल. यामुळे चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

आग्रा येथील चित्रपटगृहाबाहेर हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होताच कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले. तसेच चित्रपटगृहाने देखील आम्ही लवकरच हा चित्रपट प्रदर्शित करू असे कार्यकर्त्यांना सांगितले.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर अनेकांकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. नुकतेच अभिनेता अक्षय कुमारने देखील अनुपम खेर यांचे एक ट्विट शेअर केले आहे. यावेळी त्याने म्हणले आहे की, द काश्मीर फाईल्स या चित्रपटात तुमच्या अभिनयाबद्दल अनेक अविश्सनीय गोष्टी ऐकल्या. प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात परतताना पाहून आश्चर्य वाटले. लवकरच चित्रपट पाहण्याची आशा आहे.

दरम्यान द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे नुकतेच कलेक्शन समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच ११ मार्चला शुक्रवारी ३.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एका बाजूला या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी होत असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

महत्वाच्या बातम्या
‘द काश्मीर फाईल्स प्रदर्शीत न केल्यास चित्रपटगृहाला आग लावू; हिंदू परिषदेची थेट धमकी
शेतकऱ्यांच्या वीजतोडणीला स्थगिती; ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय
“शेतकऱ्यांवा दिवसा वीज न दिल्यास जनआंदोलन उभे करून ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावणार”
महागाई वाढली असताना गरिबांनी जगायचं कसं? केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे भडकल्या..

ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now