Share

Accident: देवदूत! आधी गाडीतील चिमुकल्या पोरांचे जीव वाचवले आणि मगच सोडला प्राण; कोल्हापूरातील घटनेची राज्यात चर्चा

kolhapu bus

अपघात(Accident):बाप्पाचे आगमन होऊन ८ दिवस झाले, बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून सुद्धा संबोधतात. त्याचप्रमाणे कोल्हापुरात बस चालकाच्या रूपात बाप्पाने येऊन त्या लहान मुलांवरचे संकट दूर केले. राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडीकडे एक बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. त्या बसमधील चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला.

यावेळी बसचालकाने मुलांच्या आयुष्याचे भान ठेवून बस बाजूला घेतली. मोठा अपघात होण्यापासून वाचला. त्यांनतर त्याने प्राण सोडले. काही वेळाआधी खोल दरीशेजारुन जाणारा रस्ता बस चालकाने पार केला होता. त्यानंतर चालकाला हा त्रास व्हायला लागला. चालकाचे नाव सतीश सातापा कांबळे (वय 35 वर्ष) असे आहे.

जगाचा निरोप घेण्याआधी चालकाने बस सुरक्षित ठिकाणी थांबवली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चालकाने काही मिनिटापूर्वीच येथील खोल दरीजवळ असलेला अर्धा किलोमिटर रस्ता पार केला होता. त्या दरी जवळून जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. सतीश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण त्यांनी अनेक छोट्या बालकांना वाचवले.

चालक सतीश कांबळे हे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी येथून भोगावती हायस्कूलला शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होते. मंगळवारला दुपारी दीड किलोमीटरच्या मार्गावर ही बस पिंपळवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन बरगेवाडीला पोहचत असतानाच चालक सतीश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

परंतु, सतीश यांनी धीर न सोडता आधी गाडी रस्त्याच्या कडेला लावली व नंतर प्राण सोडले. चालक सतीश कांबळे यांना तात्काळ कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या दारात असताना भाबड्या जीवांना सतीश यांनी जीवनदान दिले. त्यांना जीवनदान देऊन स्वतः चा जीव मात्र चालकाला गमवावा लागला.

बस चालक मुलांसाठी जणू विघ्नहर्ताच असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. याआधीही अशीच घटना घडली होती, तेव्हा ती एस टी महामंडळाची बस होती. ते चालक नुकतेच बदली होऊन आलेले होते. त्यांनी सुद्धा स्वतः चा जीव धोक्यात घालून इतर प्रवाशांना जीवनदान दिले होते. चालकांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून इतरांना वाचवण्यात फार मनाचा मोठेपणा आणि निर्मळ मन लागते अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या
Share Market: पैशांचा पाऊस! विद्यार्थ्याने शेअर बाजारातून एकाच महीन्यात कमावले ६६४ कोटी; वाचा ट्रिक..
Varsha Usgaonkar : हिसका दाखवताच वर्षा उसगावकरांनी हात जोडून मागीतली कोळी समाजाची माफी; म्हणाल्या…
राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्याचे आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाला त्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी…
PAK vs AFG : भारतासोबत अफगानिस्तानही फायनलमधून बाहेर, हायव्होल्टेज मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय

ताज्या बातम्या आरोग्य इतर

Join WhatsApp

Join Now