Share

Uddhav Thackeray : शिंदे बाहेर पडूनही अंधेरीत रोवला जाणार ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा, ‘असं’ आहे मतांचं समीकरण

Uddhav Thackeray

andheri election vote bank support uddhav thackeray  | पक्षफुटीनंतर शिवसेना पहिलीच मोठी निवडणूक लढणार आहे. अशात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हे देखील गोठवण्यात आले आहे. पण हे नवीन नाव फक्त अंधेरी पोटनिवडणूकी पुरतेच असणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग पुन्हा यावर निर्णय घेणार आहे. पण ही निवडणूक शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांसाठी महत्वाची असणार आहे.

अंधेरी पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये इथे शिवसेनेचाच आमदार निवडून आला होता. रमेश लटके येथे विजयी झाले होते. २००९ मध्ये शिवसेनेने या मतदार संघात काँग्रेसला टक्कर दिली होती. पण त्यांना निवडणूक जिंकता आली नव्हती.

आता ठाकरे गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा पाठिंबा आहे. त्यामुळे याचा फायदाही ठाकरे गटाला होणार आहे. आता या मतदार संघात ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मुरजी पटेल यांना ही उमेदवारी दिली आहे. तसेच या मतदार संघाचं गणित बघायला गेलं तर ते उद्धव ठाकरेंच्या बाजूना गेलंलं बघायला मिळतं.

२०१९ च्या निवडणूकीत ६२, ७७३ मतांनी रमेश लटके विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांचा १७ हजार मतांनी पराभव केला होता. पटेल यांना ४५,८०८ मतं मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या अमिन कुट्टी यांना २७,९५१ मतं मिळाली होती.

आता या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांचा गट आणि काँग्रेस एकत्र आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची बेरीज केली असता ती ९० हजारांपुढे जाते. ही संख्या भाजपकडून निवडणूक लढलेल्या मुरजी पटेल यांना २०१९ मध्ये मिळालेल्या मतांच्या दुप्पट होत आहे. तसेच काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबाही स्पष्ट झाला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत रमेश लटके यांनी भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा साडे पाच हजार मतांनी पराभव केला होता. त्या निवडणूकीमध्ये लटके यांना ५२,८१७ मते मिळाली होती. तर सुनील यादव यांना ४७,३३८ मते मिळाली होती. या निवडणूकीत तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार होते.

काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी यांना तब्बल ३७,९२९ मते मिळाली होती. मात्र आता महाविकास आघाडी आहे. ठाकरे गटाला काँग्रेसचा पाठिंबा मिळत असल्यामुळे या मतांची बेरीज ९०,७४६ होत आहे. हा आकडा सुद्धा भाजपच्या मतांच्या दुप्पट होताना दिसत आहे.

गेल्या दोन निवडणूकांचा विचार करता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना जनतेचा जास्त पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये सहानुभूतीचीही लाट असणार आहे. ही सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी महत्वाची बाब असणार आहे.

अशात यावेळी ठाकरे गटासाठी एक अडणच आहे, ती म्हणजे शिंदे गट. मतदारांचा कल हा प्रत्येक निवडणूकीत बदलत असतो. त्यामुळे हे पाहणंही गरजेचं राहणार आहे की अंधेरी पुर्वच्या निवडणूकीत नक्की काय घडतं? कारण एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत असणार आहे. त्यामुळे मतांची फाटाफुट होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-
Ghajini: गजनी २ मध्ये झळकणार ‘हा’ साऊथचा सुपरस्टार, आमिर खानला नाही मिळाली मुख्य भूमिका
Aliens : ८ डिसेंबरला पृथ्वीवर उतरणार एलियन्स’; टाईम ट्रॅव्हरलच्या दाव्याने जगभरात खळबळ, कारणही सांगीतले
Deepak Lande : सत्तारानंतर शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार नाराज; म्हणाला, आम्ही काय फक्त नाश्ता करायचा का?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now