Share

Mumbai : फूटीनंतर पहील्यांदाच होणार शिवसेनेची अग्नीपरीक्षा; अंधेरी विधानसभेसाठी ‘या’ दोन उमेदवारांत होणार लढत

eknath shinde uddhav thakre

Mumbai : नुकतीच अंधेरी पूर्व विधानसभेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लवकरच ही पोटनिवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्याकडे होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

आता ही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

या निवणुकीसाठी शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. तसेच भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने या निवणुकीसाठी शिंदे गटही आपला उमेदवार उभा करणार असल्याचे बोलले जात होते. शिंदे गटासाठी निवडणूक लढवण्याची ही पहिलीच संधी होती. त्यामुळे शिंदे गटाचा या निवडणुकीवर डोळा होता.

मात्र, शिंदे गटाऐवजी भाजप ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली. आता या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. शिवसेनाविरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या
Mumbai : आघाडीत बिघाडी! अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत काॅंग्रेस शिवसेने विरोधात उमेदवार उतरवणार
BJP : भाजपचा शिंदेंना दे धक्का! शिवसेनेचा आमदार असलेल्या अंधेरी विधानसभेसाठी भाजपने उमेदवार केला जाहीर
अंधेरी विधानसभेसाठी थेट मातोश्रीवरून सूत्र हलली, ‘या’ उमेदवाराला उतरवलं मैदानात, विरोधकांना फुटला घाम
BJP : भाजपचा शिंदे गटाला दणका! शिंदे गटाची हक्काची जागा बळकावली, उमेदवारही केला जाहीर

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now