बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहिण शमिता शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात मुंबईच्या अंधेरी न्यायालयातर्फे समन्स जारी करण्यात आले (Andheri Court Issued Summons to shilpa shetty including her mother and sister) आहे. समोर येत असलेल्या बातम्यानुसार, मुंबईच्या एका व्यावसायिकाने न्यायालयात शेट्टी कुटुंबीयांविरोधात २१ लाख रूपये कर्ज परत न केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने समन्स पाठवत या तिघांना २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एएनआयने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिण्यात आले की, ‘अंधेरी न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, शमिता शेट्टी आणि सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात समन्स जारी केला आहे. या तिघांवर एका व्यावसायिकाने २१ लाख रूपयांचा कर्ज परत न केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनुसार न्यायालयाने तिघांना २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे’.
https://twitter.com/ANI/status/1492573241910923264?s=20&t=SVigUQB1F97SsE5yKCgaMg
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, कथितरित्या एका ऑटोमोबाईल एजेन्सी कंपनीच्या मालकाने ही तक्रार दाखल केली आहे. या व्यावसायिकाने दावा केला आहे की, शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी त्यांच्याकडून २१ लाख रूपये कर्ज म्हणून घेतले होते. त्या दोघांमध्ये झालेल्या करारानुसार त्यांना २०१७ पर्यंत व्याजासहित सर्व रक्कम परत करायचे होते. पण असे करण्यात आले नाही.
तक्रारदात्याचे म्हणणे आहे की, शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी त्यांच्याकडून १८ टक्के व्याजाने २०१५ मध्ये ही रक्कम घेतली होती. सुरेंद्र यांच्या कंपनीच्या नावावर व्यावसायिकाने चेक दिली होती. परंतु, कर्जाची रक्कम परत करण्याअगोदरच सुरेंद्र यांचे ११ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झाले.
व्यावसायिकाने असाही दावा केला आहे की, सुरेंद्र यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलींना त्यांनी घेतलेल्या कर्जाबद्दल सांगितले होते. पण सुरेंद्र यांच्या निधनानंतर शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि त्यांच्या पत्नीने हे पैसे परत करण्यात नकार दिले. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात कायदेशीर मार्गाने जाण्याचे ठरवले.
दरम्यान, शिल्पा शेट्टी यापूर्वी तिच्या पतीमुळे माध्यमात चर्चेत आली होती. शिल्पाचा पती राज कुंद्राला कथितरित्या पोर्नोग्राफी चित्रपट काढण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या या प्रकरणात राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कंगना राणावत ‘गेहराइयां’ चित्रपटाला म्हणाली ‘कचरा’, पोर्नोग्राफी चित्रपटांशी केली तुलना
पाँडिचेरी: स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी चित्रपट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
PHOTO: ड्रग्स प्रकरणी जेलमधून सुटल्यानंतर पहिल्यांदाच IPL लिलावात दिसला आर्यन; सुहानाही होती सोबत