पुरोगामी, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे काल निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्त्वनिष्ठेसाठी कोणताही रोष पत्करणारे अशी त्यांची ओळख होती.
प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे.
ते समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी होते. तत्त्वनिष्ठेसाठी कोणताही रोष पत्करणारे अशी त्यांची ओळख होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या नंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या हस्ते होळी पेटवण्याचा आग्रह धरला होता. मात्र, एन. डी. पाटील यांनी यास स्पष्ट नकार दिला होता.
त्यांनी होळी न पेटवण्याचे कारण दिले की, मी होळी पेटवणार नाही कारण ही गोष्ट माझ्या तत्वात बसत नाही. जे मला पटत नाही ते मी करणार नाही. तसेच त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना सांगितले की, जर माझ्या या निर्णयामुळे तुम्ही नाराज असाल तर तुमच्या वतीने मी घोषणा देतो ‘एन. डी. पाटील मुर्दाबाद’ .
त्यांच्या या तत्वांमुळे ते सतत चर्चेत राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्यामुळे, त्यांचा अंत्यविधी देखील कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाशिवाय करण्यात आला. त्यांच्या तत्वाचा सन्मान ठेवून कुटुंबातील इतर लोकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
महाराष्ट्रातील तमाम डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील एक शिलेदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते अशी एन. डी. पाटील यांची ओळख होती. मात्र त्याही पलीकडे एक विचारवंत, प्रभावी वक्ते आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता अशीही त्यांची ओळख होती.
त्यांचे जवळचे नातेवाईक राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या पदांवर आणि तितक्याच व्यापक स्वरुपात कार्यरत होते. असे असले तरीही त्यांना कधीही सत्तेची अथवा सत्तेच्या जवळकीची स्वप्ने पडली नाहीत. ते आयुष्यभर सर्वसामान्यांच्याच प्रश्नांसोबतच एकनिष्ठ राहिले.
महत्वाच्या बातम्या
ओलाचं इलेक्ट्रीक स्कूटरच्या ग्राहकांसाठी खास गिफ्ट; दिली ‘ही’ भन्नाट आॅफर
घटस्फोट मृत्युपेक्षा जास्त वेदना देतो; १२ वर्षानंतर तुटलेल्या नात्यावर बोलला ‘महाभारताचा कृष्ण’
चक्क स्वत:च्या ओंजळीने सापाला पाणी पाजतोय हा पठ्ठ्या; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल