Amit Thackeray : आपल्या रोखठोक बोलीमुळे आणि करारी बाण्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सर्वांना परिचित आहे. मात्र त्यांचा पुत्र अमित ठाकरे त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, असे पाहायला मिळते. नुकताच लोकमत वृत्त माध्यमाचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यामध्ये ‘लोकमत मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन अवॉर्ड’ अमित ठाकरेंना देण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी अमित ठाकरे यांची विनम्रता पाहून बॉलिवूडचे बिग स्टार जॅकी श्रॉफ सुद्धा अवाक झाले. पुरस्कार सोहळ्याला आपली आई शर्मिला ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे पोहोचले होते. अमित ठाकरेंनी जॅकी दादांना पाहून खाली वाकून त्यांच्या पायाला हात लावत नमस्कार केला.
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे जॅकी श्रॉफ थोडे अवघडल्यासारखे झाले. त्यानंतर मात्र प्रेमाने त्यांनी अमित ठाकरेंचा हात हातात घेतला. व पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन केले. हा सर्व प्रकार अमित ठाकरेंच्या आई शर्मिला ठाकरे कौतुकाने पाहत होत्या.
या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या या विनम्र स्वभावाची चर्चा सबंध राजकीय वर्तुळात होत आहे. अमित ठाकरे यांनी याप्रसंगी बोलताना वृत्त माध्यमाचे आभार व्यक्त केले. तसेच पुढे ते बोलताना ते म्हणाले, ‘मी दोन वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. हा माझा पहिलाच पुरस्कार आहे.
मला याही पुढे खूप काम करायचे आहे. पूर्ण महाराष्ट्र फिरायचा आहे. समजून घ्यायचा आहे. आज मी काही व्यक्तींच्या प्रेमापोटी हा पुरस्कार स्वीकारत आहे,’ अशा शब्दात अमित ठाकरेंनी संबंधितांचे आभार मानले. अमित ठाकरे यांचा विनम्र स्वभाव जगासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही.
यापूर्वी पुण्यामध्ये दौऱ्यावर असताना अमित ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्याच्या घरी स्वतःचे ताट वाढून घेत जमिनीवर बसून जेवण केले होते. अमित ठाकरेंनी मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये सामान्यांप्रमाणे प्रवास केला होता. या कृती अमित ठाकरेंचा साधेपणा तसेच विनम्र स्वभाव दर्शवतात. यामुळेच मनसे कार्यकर्त्यांमध्ये अमित ठाकरेंबाबतीत मोठी क्रेझ आहे.
महत्वाच्या बातम्या-
Ajit Pawar : “…त्याचा पक्षाशी संबंध नाही” छगन भुजबळांनी केलेल्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांनी झटकले हात
Coriander : कोथिंबीरीच्या दराने मोडले सर्व विक्रम, एका जुडीसाठी मोजावे लागले १६० रुपये, शेतकरी मालामाल
shivsena : पुण्यात झालेली पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सेनेच्या वाघाची पुन्हा घरवापसी, ‘अशी’ फिरली राजकीय समीकरण