मागील काही दिवसांपूर्वी मनोरंजन क्षेत्राला ब्रेक लागला होता. मात्र आता अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या एका चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमध्ये ते सर्व सामान्य लोकांच्या तोंडात याच चित्रपटाचे नाव आहे. मात्र आता एका वेगळ्या कारणासाठी या चित्रपटाचे नाव सर्वांच्या तोंडात आहे.
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडेचा ‘गहराइया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेहमी चर्चेत होता. यामागचे कारण म्हणजे दीपिकाने चित्रपटात दिलेले किसिंग सीन आहे. पण आता एका यूजरने या चित्रपटातील अशी चूक पकडली आहे, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
ही चूक एका युजरने सर्वांच्या समोर आणली आहे. या युजरने ‘गहराइया’ या चित्रपटातील एका सीनचे दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे स्क्रीनशॉट्स अमांडा बेली नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहेत. हा शेअर केलेला स्क्रीनशॉट चित्रपटातील अनन्या पांडेच्या एका सीनचा आहे.
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1495721441274310662?t=AKZ69bajS1vb40P9EJpurQ&s=19
युजरने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये अनन्या पांडे पाणी पिताना दिसत आहे. आता सर्वांना वाटेल यात काय चूक आहे. पण जर नीट पाहिलात तर लक्षात येईल की, एकाच सीनमध्ये अनन्याच्या हातात दोन वेगवेगळे ग्लास दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे हा सीन एकच आहे. पण सीनमध्ये दोन वेगवेगळे ग्लास वापरले आहेत.
जसे या ट्विटर युजरने ही बारीक चूक लक्षात आणून दिली. तसे त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. इतकेच नव्हे तर, या युजरने अनन्याचा या चित्रपटातील पाणी पितानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पित असलेल्या पाण्याचा ग्लास वेगवेगळा दिसत आहे.
दीपिका पदुकोणचा ‘गहराइया’ हा चित्रपट ११ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला होता. या चित्रपटात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा हे कलाकार आहेत. चित्रपटात दीपिकाने सिद्धांत चतुर्वेदीसोबत बरेच इंटिमेट सीन दिले आहेत. ज्याची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शकुन बत्राने केले आहे.