महिंद्रा ग्रुप आता प्रथमच इलेक्ट्रिक फोर व्हीलर सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी तयार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी 11 फेब्रुवारी रोजी या मोठ्या हालचालीची घोषणा केली आहे. यावेळी कंपनी तीन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करणार आहे, यामुळे आता त्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक टीझर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक एसयूव्हीची झलक पाहिली जाऊ शकते. एक नव्हे तर तीन एसयूव्ही नवीन कार दाखवण्यात आल्या आहेत. कंपनी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही जुलै 2022 पर्यंत भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीला ब्रिटनच्या ऑक्सफोर्डशायर मध्ये डिझाइन करण्यात आले आहे.
याशिवाय, महिंद्राने आपल्या Mahindra Born Eletric चे ट्विटर हँडल सुद्धा अँक्टिव केले आहे. त्यांनी यात पहिले ट्विट करून म्हटले की, बॉर्न इलेक्ट्रिक व्हीकलच्या जगात आपले स्वागत आहे. या गाड्यांचे ग्लोबल डिझायनर, इंजिनियर आणि एक्सपर्टच्या टीमने बनवले आहे.
महिंद्राची ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा मोटर्सच्या ईवी नेक्सन(EV Nexon) आणि मारुती सुझुकी सारख्या भारतीय ब्रँड्स तसेच ह्यूंडाई( Hyundai) आणि एमजी मोटर(MG Motor) सारख्या बड्या कंपन्यांना टक्कर देईल.या कंपन्यांनी आधीच इलेक्ट्रिक वाहने म्हणून आपला ठसा उमटवला आहे.
ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँचिंग नंतर महिंद्रा, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि एमजी मोटर सारख्या कंपन्यांच्या लिस्ट मध्ये येईल, ज्या आधीच इलेक्ट्रिक व्हीकलची विक्री करीत आहेत. कंज्यूमर फोक्स ब्रँड असूनही महिंद्रा या इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत कमी करण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1492127247041380352?t=kGE1HgRFcweseRdpwfpJCg&s=19
या नवीन इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त (EVs), महिंद्रा आपली अनुकूल SUV XUV300 देखील इलेक्ट्रिकमध्ये बदलत आहे. महितीनुसार, Mahindra XUV300 इलेक्ट्रिक या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होईल. महिंद्रा शाश्वत गतिशीलतेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.