Share

बाबो! बाईकवर समोर बसली होती पत्नी, मागे होत्या ३७ खुर्च्या, पाहून आनंद महिंद्राही झाले अवाक, म्हणाले..

भारतात बहुतेक दुचाकी म्हणजे बाइक, स्कूटर आणि मोपेड्स विकल्या जातात. आता लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की अधिक मोटारसायकल विकल्या जाण्याचे कारण काय? कारपेक्षा स्वस्त आहे, कुठेही सहज नेता येते, पार्किंगसाठी जास्त जागा लागत नाही, अशी अनेक उत्तरे आहेत. पण या व्यतिरिक्त, उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटद्वारे सांगितले आहे की, भारत हा दुचाकी वाहनांचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र तसेच सर्वात मोठा दुचाकी देश का आहे?(anand-mahindra-was-also-amazed-to-see-on-bike-37-chairs)

आनंद महिंद्रा यांनी एक मजेशीर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक माणूस त्याच्या मोपेडवर आपल्या पत्नीसोबत बसलेला आहे आणि त्या मोपेडवर अनेक चटई आणि खुर्च्या आहेत. या व्यक्तीने आपल्या मोपेडवर इतक्या गोष्टी ठेवल्या आहेत की लोक कल्पनाही करू शकत नाहीत. मालवाहू तीनचाकीमध्ये जितके सामान नेता येईल तितके सामान त्या माणसाने मोपेडवर नेऊन त्याला मालवाहू वाहन बनवले आहे.

या फोटोसोबत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन दिले आहे की, आता तुम्हाला कळले असेल की, भारतात सर्वाधिक दुचाकी का तयार होतात. छोट्या दुचाकी किंवा इतर वाहनांचा इंच बाय इंच कसा वापर करायचा हे आपल्याला माहीत आहे. हे चित्र पाहिल्यावर तुमची नजर त्यावर खिळलेली असेल आणि खरंच असं घडू शकेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

या माणसाने मोपेडवर बऱ्याच चटई ठेवल्या आहेत आणि त्यावर त्याची पत्नी बसली आहे. तो माणूस स्वतः ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि मागच्या बाजूला 40-50 खुर्च्याही लोड केल्या आहेत. खरंतर हा जुगाड फक्त भारतातच पाहायला मिळतो. हा फोटो मजेशीर स्वरात शेअर करून आनंद महिंद्रा यांनी नवीन जुगाडबद्दल अनेकांना सांगितले आहे, आणि म्हणाले आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमची मोटरसायकल किंवा स्कूटर छोट्या मालवाहू वाहनात बदलू शकता.

महिंद्राच्या या पोस्टवर एका यूजरने लिहिले की, त्याने (मोपेड चालकाने) दोन्ही खुर्च्यांचा वरचा भाग रिकाम्या का ठेवला? दुसर्‍या वापरकर्त्याने परेड दरम्यान मोटारसायकलवर अप्रतिम कामगिरी करत असलेल्या जवानांचे फोटो पोस्ट केले आणि लिहिले, हे अतुल्य भारताचे सौंदर्य किंवा प्रतिभा आहे सर…

आनंद महिंद्रा यांनी एका युजरचे ट्विट रिट्विट केले आहे ज्याने आश्चर्यकारक कामगिरी करत असलेल्या सैनिकांचे फोटो पोस्ट केले आहे. महिंद्रा हे मनोरंजक ट्विट करण्यासाठी ओळखले जाते. सुमारे 9 दशलक्ष (90 लाख) लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. ते 272 लोकांना फॉलो करतात.

महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरमध्ये प्रचार करत असताना अज्ञात व्यक्तीने माझा पाठलाग केला, मी ज्या ज्या ठिकाणी सभा घेते त्या ठिकाणी
लवकरच अंकिता लोखंडेच्या घरीही हालणार पाळणा? लॉकअपमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली..
मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण आईच्या निधनानंतर मराठी अभिनेता झाला भावूक
आता हिंदू देखील अल्पसंख्याक होणार; मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली ‘ही’ माहिती

ताज्या बातम्या लेख

Join WhatsApp

Join Now